Minority Communities Population : स्वातंत्र्यानंतर भारतात अल्पसंख्याकांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढली : इक्बाल सिंह लालपुरा
Minority Communities Population : देशाच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत अल्पसंख्याक समुदायांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढली आहे, असं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांनी म्हटलं.
![Minority Communities Population : स्वातंत्र्यानंतर भारतात अल्पसंख्याकांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढली : इक्बाल सिंह लालपुरा India witnessed five percent rise in minority population since independence says NCM chief Iqbal Singh Lalpura Minority Communities Population : स्वातंत्र्यानंतर भारतात अल्पसंख्याकांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढली : इक्बाल सिंह लालपुरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/30/0185b0430a5744cb72703d92cf557c91168016124219283_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Minority Communities Population : देशाच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत अल्पसंख्याक समुदायांची (Minority Communities) लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढली आहे, तर बहुसंख्य लोकसंख्या (Population) पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. हाच भारतातील अल्पसंख्याक सुरक्षित असल्याचा पुरावा आहे, असं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे (National Commission for Minorities) अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा (Iqbal Singh Lalpura) यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील (New Delhi) आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये (Ambedkar International Centre) बुधवारी (29 मार्च) आयोजित राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वार्षिक परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.
अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली, बहुसंख्य लोकसंख्या कमी झाली : इक्बाल सिंह लालपुरा
इक्बाल सिंह लालपुरा म्हणाले की, "स्वातंत्र्य (Independence) मिळाल्यापासून आतापर्यंत भारतातील बहुसंख्य लोकसंख्या पाच टक्क्यांनी कमी झाली आहे आणि अल्पसंख्याकांची लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढली आहे. यावरुन भारताने आपल्या अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवली असल्याचे दिसून येतं." "असा कोणताही व्यवसाय नाही ज्यात अल्पसंख्याकांचं योगदान नाही. न्यायव्यवस्था, क्रीडा, आरोग्यसेवा आणि इतर अनेक क्षेत्रांसह प्रत्येक क्षेत्रात आणि व्यवसायात अल्पसंख्याकांचे मोठे योगदान आहे," असं ते म्हणाले.
देशाच्या विकासात अल्पसंख्याकांची महत्त्वाची भूमिका : जॉन बार्ला
दुसरीकडे राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वार्षिक अधिवेशनाला (Annual Conference of the State Minorities Commissions) संबोधित करताना, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला (John Barla) म्हणाले की, "अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी आपल्याकडे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांसारख्या संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. "सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' हे सरकारचे व्हिजन (Government Vision) पूर्ण करण्यात आमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे." राष्ट्रीय विकासात सर्व लोकांचे योगदान आहे आणि या प्रयत्नात अल्पसंख्याकांचीही महत्त्वाची भूमिका आहे, असं म्हणत जॉल बार्ला यांनी अल्पसंख्याक आयोगाच्या कामांचंही कौतुक केलं.
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वार्षिक अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा?
या परिषदेत राज्य अल्पसंख्याक आयोगांना राज्यांतील अल्पसंख्याकांना भेडसावणार्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या कल्याण आणि सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं. यावर्षी, परिषदेमध्ये भारताच्या विकासात अल्पसंख्याकांची भूमिका आणि अल्पसंख्याकांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात प्रशासनाची भूमिका या विषयांवर दोन पॅनेल चर्चांचा समावेश होता.
हेही वाचा
Minorities In Pakistan: पाकिस्तानात 'हिंदू' हा सर्वात मोठा अल्पसंख्याक गट, इतकी आहे लोकसंख्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)