एक्स्प्लोर
शौचालयातील पाण्याने चहा, ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओत ट्रेनमधील कर्मचारी तेथील शौचालयामधील पाण्याने चहा बनवत असल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली : एकीकडे सरकार बुलेट ट्रेनची तयारी करत असताना दुसरीकडे रेल्वेचा गचाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेनमधील एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ट्रेनमधील कर्मचारी तेथील शौचालयामधील पाण्याने चहा बनवत असल्याचं दिसत आहे.
सुरुवातीला हा व्हिडीओ खरा आहे की, नाही याबाबत बरीच चर्चा सुरु होती. पण आता रेल्वेकडूनच याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे याप्रकरणी वेंडरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हा व्हिडीओ मागील वर्षी डिसेंबरमधील आहे. असं स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आलं आहे. ही घटना चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्सप्रेसमधील असल्याचं समोर आलं आहे. 'याप्रकरणी वेंडिंग कंत्राटदार पी शिवप्रसाद याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.' अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी एम उमाशंकर यांनी दिली.Railway vendor fined Rs 1 lakh after in a viral video people were seen bringing out tea/coffee cans from inside a train toilet at Secunderabad(Telangana) station in December 2017. pic.twitter.com/HUc30YnJzi
— ANI (@ANI) May 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
