(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indigo Flights: विमानाचे उड्डाण होताच अवघ्या वीस मिनिटांत झाले एमर्जन्सी लँडिंग, केंद्रीय मंत्र्यांसोबत आमदार देखील करत होते विमान प्रवास
Indigo Flights Lands Back at Guwahati: इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानाचे काही तांत्रिक कारणास्तव इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात आसामच्या दिब्रुगडचे आमदार देखील प्रवास करत होते.
Indigo Flights Lands Back at Guwahati: आसाममधील गुवाहाटीमधून दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) विमानाने रविवारी (4 जून) रोजी सकाळी उड्डाण केले. परंतु वीस मिनिटांनी काही तांत्रिक कारणांमुळे हे विमान पुन्हा गुवाहाटीला परत नेण्यात आले. तसेच या विमानाचे लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलाई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्या सोबत दोन आमदार देखील प्रवास करत होते. त्याचप्रमाणे वेळेत योग्य निर्णय घेतल्याने दुर्घटना टळल्याचं सांगण्यात येत आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने रविवारी सकाळी 8.40 मिनिटांनी उड्डाण केले. त्यांनंतर लगेच 20 मिनिटांनी विमानाला पुन्हा गुवाहाटीच्या दिशेने वळवण्यात आले. या विमानातील सगळे जण सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. विमानचे जेव्हा पुन्हा जमिनीवर उतरवण्यात आले त्यानंतर आमदार प्रशांत फूकन यांनी सांगितले की, ' तांत्रिक कारण्यास्तव विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.' तसेच विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं.
A Dibrugarh-bound IndiGo flight was diverted to Guwahati’s Lokpriya Gopinath Bordoloi International after the pilot of the plane announced snag in engine of the aircraft. Over 150 passengers were travelling on the flight, including Union Minister of State for Petroleum and… pic.twitter.com/umZb0sm75V
— ANI (@ANI) June 4, 2023
केंद्रीय मंत्री करत होते प्रवास
या विमानामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्यासह दिब्रुगडचे आमदार प्रशांत फुकन आणि दुनियाजनचे आमदार तेरेश ग्वाला हेही उपस्थित होते.तसेच त्यांच्यासोबत इतर अनेक प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. इंडिगोचे 6E2652 हे विमान काही तांत्रिक कारणांमुळे गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 मिनिटांत परत उतरवण्यात आले.
दिब्रुगडचे आमदार प्रशांत फुकन यांनी सांगितले की, 'आम्ही गुवाहाटीहून उड्डाण केले तेव्हा कोणतीही अडचण आली नाही, परंतु २० मिनिटांनंतर विमान गुवाहाटीला परत आले आणि लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आम्हाला एअरलाइन्सच्या कर्मचार्यांनी कळवले की विमानात काही तांत्रिक समस्या आहे,त्यामुळे विमानाला परतावे लागले.' विमानतळ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान सुखरुप परतले असून गुवाहाटी येथे उतरले. परंतु अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.