एक्स्प्लोर

Bihar Flood : बिहारमधील प्रलयकारी पुरासमोर हेलिकॉप्टरही हतबल! ब्लेड तुटल्याने थेट पाण्यात हार्ड लँडिंग'

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील औरईमध्ये सुद्धा हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. विमानात 3 सैनिक आणि 2 पायलट होते, सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत.

Bihar Flood : पुण्यातील हेलिकाॅप्टर दुर्घटनेला काही तास होत नाहीत तोपर्यंत बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील औरईमध्ये सुद्धा हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. विमानात 3 सैनिक आणि 2 पायलट होते, सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर सीतामढी येथून पूर मदत सामग्री घेऊन जात होते. हवाई दलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पूरग्रस्त भागात मदत साहित्य पोहोचवण्यासाठी गेलेले भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. ब्लेड तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, भारतीय वायुसेनेचे हे हेलिकॉप्टर मुझफ्फरपूरच्या औरई भागात मदत सामग्री पोहोचवण्याचे काम करत होते आणि सकाळपासून अन्नाची पाकिटे वाटत होते. या हेलिकॉप्टरच्या एका ब्लेडमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली होती, त्यानंतर हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्यात आले होते.

16 जिल्ह्यांतील सुमारे 10 लाख लोकसंख्येला पुराचा फटका

नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहारमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. 16 जिल्ह्यांतील सुमारे 10 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पूर्णिया, सहरसा, सुपौल, दरभंगा येथे परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचवेळी देशात मान्सूनचा हंगाम संपणार आहे. दक्षिण आणि ईशान्येकडील राज्य वगळता कोणत्याही राज्यात पावसाचा इशारा नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पावसाळा संपला आहे.

राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 36 अंशांच्या वर पोहोचले आहे. मंगळवारी गंगानगर, फलोदी येथे सर्वाधिक 39.8 अंश तापमानाची नोंद झाली.छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 37.2 अंश नोंदवले गेले. मध्य प्रदेशातील खजुराहो हे 36.8 अंश तापमानासह राज्यातील सर्वात उष्ण ठरले. हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

या वर्षी देशात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 1500 लोकांचा मृत्यू झाला

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, या मान्सून हंगामात (1 जून ते 30 सप्टेंबर) सामान्यपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला. दक्षिण-पश्चिम मान्सून हंगामाच्या दीर्घ कालावधीच्या सत्रात (LPA) सरासरी पाऊस 108 टक्के होता. या कालावधीत 934.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2020 नंतरचा हा उच्चांक आहे. हवामान खात्याने 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, तो ओलांडला. वास्तविक पाऊस आणि सामान्य पाऊस यामध्ये ४ टक्क्यांचा फरक होता. यंदा मान्सून चार महिन्यांहून अधिक काळ बरसला.

विभागाच्या म्हणण्यानुसार, चालू पावसाळ्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये देशभरात 1492 लोकांचा मृत्यू झाला. पूर आणि पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये 895 जणांना जीव गमवावा लागला, तर वादळ आणि वीज पडून 597 जणांचा मृत्यू झाला. चालू पावसाळ्यात 525 अतिवृष्टीच्या घटना घडल्या. गेल्या ५ वर्षांतील हा उच्चांक होता. या कालावधीत 115.6 मिमी ते 204.5 मिमी पाऊस पडला. अतिवृष्टीच्या 96 घटना घडल्या, ज्या दरम्यान 204.5 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Embed widget