एक्स्प्लोर

पाणीबाणी! जायकवाडीत फक्त 16 टक्के पाणीसाठा शिल्लक, मराठवाड्यातील टँकरचा आकडाही वाढला

Jayakwadi Dam : मराठवाड्यातील टँकरचा आकडा थेट 1 हजार 63 वर पोहचला आहे. ज्यात सर्वाधिक 443 टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरु आहेत. तर जायकवाडी धरणात फक्त 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Jayakwadi Dam Water Storage : मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) केवळ 15.62 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन (Water Evaporation) देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशात अनेक जिल्ह्यात टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील टँकरचा आकडा थेट 1 हजार 63 वर पोहचला आहे. ज्यात सर्वाधिक 443 टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) सुरु आहेत. 

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा (Jayakwadi Dam Water Level)

  • जायकवाडी धरण पाणी पातळी फुटामध्ये : 1501.07 फूट 
  • जायकवाडी धरण पाणी पातळी मीटरमध्ये : 457.526 मीटर 
  • एकूण पाणीसाठा दलघमी : 1077.285 दलघमी
  • जिवंत पाणीसाठा दलघमी : 339.179 दलघमी
  • जायकवाडी धरण पाणीसाठा टक्केवारी : 15.62 टक्के 
  • जायकवाडी धरण पाण्याची आवक :  00
  • जायकवाडी धरण बाष्पीभवन : 1.088
  • उजवा कालवा विसर्ग : 900 क्युसेक 
  • डावा कालवा विसर्ग : 2000 क्युसेक

मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा (Last year current day water storage) 

  • मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 1205.616 दलघमी
  • मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 55.53 टक्के 
  • 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 876.8967 दलघमी 

मराठवाड्यात 1 हजार 63 टँकरने पाणीपुरवठा...

मराठवाड्यात यंदा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मराठवाडा टँकरवाड्याच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मागील महिन्याभरात अचानक टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मराठवाड्यात आज घडीला 1 हजार 63 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक गावात पाण्याचा स्रोतच नसल्याने गावकऱ्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अशावेळी या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील 720 गावं आणि 237 वाड्यांवर एकूण 1 हजार 63 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ज्यात 15 शासकीय आणि 1048 खाजगी टँकरचा समावेश आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरु....

जिल्हा  गावं संख्या  वाड्या संख्या  शासकीय टँकर खाजगी टँकर एकूण टँकर
छत्रपती संभाजीनगर  289 48 00 443 443
जालना  219 61 09 334 343
बीड  162 126 02 197 199
परभणी  01 -- -- 01 01
हिंगोली 00 00 00 00 00
नांदेड  01 02 00 03 03
धाराशिव  40 -- -- 66 66
लातूर  08 -- 04 04 08
एकूण  720 237 15 1048 1063

इतर महत्वाच्या बातम्या : 

Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, चौघांचा मृत्यू; शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde Meets | आजारी असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने मुंडेंना भेटायला गेलो- सुरेश धसSantosh Deshmukh Case | देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आरोपABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 February 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Nashik Godavari : नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.