ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी मुंबईत दाखल...उद्या भाजपचा विधीमंडळ पक्षनेता निवडणार...शिंदे आणि अजित पवारांना भेटून महायुतीत आलबेल असल्याचा संदेश देणार...
महायुती उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार...विधीमंडळ पक्षनेता निवडीनंतर दुपारी ३.३० वाजता राज्यपालांना भेटणार असल्याची एबीपी माझाला माहिती...
एकनाथ शिंदे आणिल फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत अंतिम तोडगा नाहीच...शिंदेंना हवं असलेलं गृहखातं भाजपकडेच राहणार असल्याची एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती...
वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांसोबत एकनाथ शिंदेंची चर्चा, शपथविधीपूर्वी शिवसेनेच्या मागण्या पूर्ण झाल्यात का याचा सस्पेन्स कायम
कालच्या दुराव्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याचा एकत्र आढावा, हम साथ साथ है दाखवण्याचा प्रयत्न
शिवसेना आणि भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर.. शिवसेनेची ७ तर भाजपच्या १६ मंत्र्यांच्या नावांची यादी ..भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवण्याचे ठाकरेंचे आदेश, स्वबळावर लढण्याचा माजी नगरसेवकांचा सूर
भाजपचं सरकार आल्याने आता मारवाडीतून बोला, गिरगावातील दुकानदाराची महिलेवर दादागिरी..मारवाडीतून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्याला मनसैनिकांकडून चोप..
सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंच्या उपस्थितीत सर रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचं लोकार्पण, राजकारणातही थर्ड अम्पायर हवा, मनसेप्रमुखांची टिपण्णी
बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत; खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय, पाण्याचं आणि पाणी विकणाऱ्या कंपन्यांचं ऑडिट होणार