एक्स्प्लोर

Chandrapur News : नाताळपर्यंत ताडोबाची सफारी हाऊसफुल्ल! सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पसंती व्याघ्र प्रकल्पाला

Tadoba Online Booking : दिवाळी ते नाताळ दरम्यानच्या सुट्ट्यांमध्ये ताडोबाची सफारी ही फुल्ल झाली असून 30 नोव्हेंबरपर्यंतचे बुकिंग हे 100 टक्के करण्यात आले आहे.

चंद्रपूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जंगल सफारी करण्याकडे पर्यटकांचा कल वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच जगप्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील (Chandrapur) ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची (Tadoba Andhari Tiger Reserve) सफारी देखील 30 नोव्हेंबरपर्यंत हाऊसफुल्ल झाल्याचं पाहायला मिळतंय. 30 नोव्हेंबरपर्यंतचे 100 टक्के फुल्ल झाले आहे. इतकेच नव्हे तर नाताळमधील बुकिंग देखील आताच करत नाताळमधील बुकिंग देखील फुल्ल झाल्याचं सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरच्य पहिल्या दहा दिवसांत 7 हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. त्यातच कोअर झोनचे 6 आणि बफर झोनच्या 19 प्रवेशद्वारावरील बुकिंग पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात येतय. पावसाळ्यानंतर या सफारीची सुरुवात होताच पर्यटकांनी बुकिंग केलं होतं. 

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले आहे. पट्टेदार वाघांची भूमी म्हणून ताडोबा ओळखलं जाते. पट्टेदार वाघाचं हमखास दर्शन इथं होत असल्यानं पर्यटकांसोबतच हौशी छायाचित्रकारही मोठ्या संख्येनं इथं हजेरी लावतात. ताडोबा-जंगलात प्राण्यांना नावे देण्याची एक अलिखित प्रथा आहे.

 इतरत्रही पर्यटकांची मोठी गर्दी

दिवाळीच्या लागोपाठ सुट्ट्या आणि हिवाळ्यातील जंगल सफारीचा उत्तम काळ यामुळे व्याघ्र प्रकल्पानां भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये तरुणांची संख्या विशेष आहे. देशासह जगभरातील पर्यटकांना कायम आकर्षित करणारं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाशिवाय इतर नवेगाव नागझिरा, उमरेड कराडला, टिपेश्वर, बोर, इत्यादी व्याघ्र प्रकल्पांना देखील पर्यटकांनी पसंती दिली आहे. दिवाळीच्या तीन महिन्यांपासूनच पर्यटकांनी नोंदणी केल्यानं सध्याच्या घडीला व्याघ्र प्रकल्प जवळजवळ फुल झाले आहेत. 

नवेगाव-नागझिरातील चोरखमारा परिसरात पर्यटकांना वाघाचं दर्शन

गोंदिया जिल्हात नवेगाव-नागझिरा हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसेनं येतात. दिवाळीच्या सुट्टी निमित्त नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटकांना सतत 4 दिवसांपासून वाघाचं दर्शन होत आहे. तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह संचारला असून दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

काही महिन्यांपूर्वी ताडोबातील ऑनलाइन बुकिंगमध्ये काही घोटाळा झाल्यमुळे ऑनलाइन बुकिंग बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान यामुळे  रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालकांना मोठा फटका बसला होता. पण काहीच दिवसांत हे बुकिंग पुन्हा चालू करण्यात आले. दरम्यान सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आता हे ऑनलाइन बुकिंग फुल्ल असल्याचं पाहायला मिळतंय. 

हेही वाचा : 

लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे विदर्भातील व्याघ्र प्रकल्प, पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?Yuzvendra Chahal + Dhanashree Verma : चहल आणि धनश्री मुंबईतील कोर्टात दाखल | FULL VIDEOChitra Wagh Angry Speech : ओ परब! तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघांचा रुद्रावतारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 20 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
बीडमध्ये चाललंय काय, महिलेनं पोलीस ठाण्यासमोर अंगावर ओतून घेतलं डिझेल; सुदैवाने दुर्घटना टळली
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Meerut Case : हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
हॅलो साहिल, सौरभ झोपलाय लवकर घरी ये; दोघांनी हात, शीर धडावेगळं केलं अन् बायको बाॅयफ्रेंडच्या घरी घेऊन गेली
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Embed widget