Chandrapur Crime : पोलीस असलेल्या वर्गमित्राने काटा काढला, हत्या करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत लपवला, चंद्रपुरात 36 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून
Chandrapur Crime : चंद्रपूर येथे 37 वर्षीय महिलेचा तिच्या वर्गमित्रानेच खून केल्याचे समोर आले आहे.
Chandrapur Crime : चिमूर (Chimur) येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आज (दि.10) अखेर सापडलाय. हा मृतदेह नागपूर (Nagpur) शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आलाय. दरम्यान, या महिलेच्या हत्येप्रकरणात पोलीसांनी नरेश डाहूले या चंद्रपूर (Chandrapur Crime) स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस (Police) कर्मचाऱ्याला अटक (Chandrapur Crime) केली आहे. अरुणा काकडे (वय 37) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.
निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने केला वर्ग मैत्रिणीचा खून
याबाबत अधिकची माहिती अशी की, चिमूर येथील देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. मिसिंग तक्रार असल्याने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावला आहे. निलंबत पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याने अरुणा काकडे (वय 37) या महिलेचा खून केला असल्याचे समोर आले आहे.
लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते
मृत्यू झालेली महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते. 26 तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. दरम्यान, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा दाबून हत्या केली.
नरेश डाहूलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश
दरम्यान, महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्रवेळा येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरातील शौचालयाच्या टाकीमध्ये लवपला होता. त्यानंतर निलंबित पोलीस कर्मचारी असलेला आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचारी असलेल्या नरेश डाहूलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश आढळला होता. याच आरोपावरून त्याला मागील वर्षी अटक करून पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.
धक्कादायक! म्यानमार टू भारत, व्हाया बांगलादेश... पुण्यात येऊन 500 रुपयांत बनावट आधार कार्ड काढलं अन् जागा घेऊन घरही बांधलं https://t.co/i3DxCvC3GH#Bangladesh #India #Pune #Aadhaarcard
— ABP माझा (@abpmajhatv) December 10, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या