एक्स्प्लोर

Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच

Santosh Deshmukh Case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बीड : केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर (Ahmednagar Ahmedpur Highway) आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) केले आहे. आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून सहा आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सहा जणांवर केज पोलीस ठाण्यात (Kej Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी सहा पथके आरोपींच्या शोधासाठी स्थापन केली. धाराशिव आणि बीडमध्ये पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. केज जवळील तांबवा गावातील शिवारातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे. तर पुढील 48 तासात आरोपींना अटक करू. त्यामुळे ग्रामस्थांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आता उर्वरित आरोपींना पकडण्यात पोलिसांना नेमकं कधी यश मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग मध्ये मागच्या दोन तासापासून रास्ता रोको सुरू आहे तर तिकडे केज शहरांमध्ये सुद्धा बीड लातूर रोडवर रस्ता रोको सुरू आहे.. मस्साजोग जवळ अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर टायर जाळले आहेत. तर बीड लातूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

आणखी वाचा 

Kurla Best Bus Accident: घरातून निघताना भांडण झालेलं?, मानसिक स्थिती कशी होती?; बस चालक मोरेच्या पत्नीने सगळं सांगितलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Embed widget