तृप्ती देसाई बीडमध्ये; पोलीस अधीक्षकांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह, 26 अधिकाऱ्यांचं वाल्मिक कनेक्शन
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 26 जणांच्या नावासह बीड पोलीस अधीक्षकांकडे हे पोलीस वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप केला होता.

Beed: बीड जिल्ह्यातील 6 अधिकारी आणि 20 कर्मचाऱ्यांची वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप केल्यानंतर आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर या प्रकरणाची चौकशी केली असून त्यांचा जबाब घेण्यात आला आहे. त्यानंतर तृप्ती देसाईंनी 26 अधिकारी कर्मचाऱ्यांचे महत्वाच्या पुराव्यांचा पेनड्राईव्ह पोलीस अधीक्षक कार्यालयात दिला आहे. याच अनुषंगाने तृप्ती देसाई यांना आज सकाळी साडेअकरा वाजता पुराव्यानिशी हजर झाल्या होत्या. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी तृप्ती देसाईंचा जबाब घेतला असून पोलीस दलातील 26 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे देसाई यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना सादर केले आहेत. यात एक महत्त्वाचा पेनड्राइव्ह त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलाय. (Beed)
26 अधिकाऱ्यांचे वाल्मिक कनेक्शन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराडची बीडमध्ये असणारी दहशत समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. यात गुन्हे अन्वेषण विभागाने सादर केलेल्या दोषारोपपत्रात वाल्मिक कराडसोबत अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 26 जणांच्या नावासह बीड पोलीस अधीक्षकांकडे हे पोलीस वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना बीडमध्ये हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. या नोटीशीप्रमाणे तृप्ती देसाई पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या.
पुराव्यांचा पेनड्राइव्ह दिला, तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल
26 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे मी दिले असून माझा जबाब घेण्यात आला आहे. याचे सर्व पुरावे पेन ड्राइवच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या अधिकारी कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे.. त्यातील अनेक कर्मचारी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आज घेण्यात आलेल्या जबाबानंतर याची गोपनीय चौकशी करू अस आश्वासन देसाई यांना देण्यात आले आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील 26 अधिकारी कर्मचारी वाल्मीक कराड याच्या मर्जीतील असल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी केली होती. या तक्रारीनंतर बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देसाई यांना दिले होते. याच आदेशावरून आज तृप्ती देसाई पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहिल्या.. यादरम्यान पोलीस दलातील 26 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे देसाई यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना सादर केले.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

