Pune News: आधी नाराजीच्या चर्चा अन् आता शरद पवारांच्या येण्याआधी पुण्यात जयंत पाटील-अजितदादांची बंद दाराआड बैठक, चर्चांना उधाण
Pune News: वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्येमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यानंतर आज राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं चित्र आहे. त्याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्याची माहिती आहे. वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा
वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार बैठकीला दाखल होण्याआधीच जयंत पाटील आणि अजित पवार या दोघामध्ये बंद केबिनमध्ये चर्चा सुरू आहे. आजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार हे व्हीएसआयच्या नियामक मंडळात आहेत. राजकीय वर्तुळात एकीकडे जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत, तर दुसरीकडे वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी आलेले असताना जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये केबिनमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे, यासाठी हे नेते एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज नियामक मंडळाची बैठक आहे आणि त्यासाठी शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते कमिटीमध्ये आहेत. या बैठकीसाठी आठ वाजण्याच्या सुमारास अजित पवार दाखल झाले, त्यांनी अधिक सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, त्यानंतर त्यांना समजलं जयंत पाटील देखील आले आहेत. शरद पवार अजून पोहोचणार आहेत, अजित पवार यांनी ओएसडींना पाठवून जयंत पाटलांना बोलावून घेतलं अशी माहिती आहे. त्यानंतर काही वेळात जयंत पाटील अजित पवारांच्या केबिनमध्ये आले. ह्या केबिनमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पक्षांमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर त्यांच्या पक्षांतराबाबत देखील चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. अशातच या भेटीमुळे आणि चर्चेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दहा वाजेपर्यंत शरद पवार या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळाचं लक्ष आज पुण्यातील या बैठकीकडे देखील असणार आहे.
वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये आज बैठक
पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार आहेत. पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी हे नेमके एकत्र असणार आहेत. त्याशिवाय जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर असे साखर उद्योगातील नेतेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

