Rohini Khadse on Chitra Wagh : चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
Rohini Khadse on Chitra Wagh : कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही! त्यामुळे कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला नको, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी सुनावलं

Rohini Khadse on Chitra Wagh : माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी, ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय, याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आमदार चित्रा वाघ यांना सुनावले.
चार पक्ष फिरून येऊन तुम्ही...
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते. चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. विचारा तुमच्या वरिष्ठांना... शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही! त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला. उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको.
माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय… याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं...
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 22, 2025
तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या…
दुसरीकडे, दिशा सालियन प्रकरणात आमदार अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी चित्रा वाघ यांनी कमरेखालील भाषा वापरल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सभागृहातील भाषेवरून सडकून टीका होत आहे. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर एक उपरोधिक व्हिडिओ शेअर करत टीका केली होती.
चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना ‘बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!’, असं म्हटलं होतं. चित्रा वाघ यांनी कोणाला तरी खूश कऱण्यासाठी केलं होतं का? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला होता. यावर चित्रा वाघ यांनी उत्तर देताना ‘रोहिणी खडसे यांचे वडील विधान परिषदेत माझ्या समोर बसतात. त्यांनी त्यांना विचारावं, ते जास्त चांगलं सांगतील’, अशी प्रतिक्रिया दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

