Jitendra Awhad : तुम्ही औरंगजेबाला इतिहासातून काढू शकत नाही, काढलं तर शिवाजी महाराज समजवू शकत नाही- जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad on Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर भाष्य केले आहे.

Jitendra Awhad on Aurangzeb Tomb Row : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb kabar) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
"औरंगजेबाची कबर असली काय आणि नसली काय काहीही फरक पडत नाही. तुम्ही औरंगजेबाला इतिहासातून काढू शकत नाही. औरंगजेबाला काढलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना समजवू शकत नाही. उद्या रामायणातून रावण काढा आणि राम मला समजून सांगा. महाभारतातून कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा, महाराभारत समजून सांगा. असे क्रूरकर्मा असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सर्व गोष्टीला सरकारचा छुपा पाठिंबा
दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हलवली नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याआधी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली. यांना महाराष्ट्र जाळून टाकायचा आहे, त्यामुळे हे सर्व चालत आहे. रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का, अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का, हिटलरला बाजूला करून दुसरे विश्व युद्ध सांगता येईल का, असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले आहेत. या सर्व गोष्टीला सरकारचा देखील एक छुपा पाठिंबा आहे, असा आरोप देखील त्यांनी महायुती सरकारवर केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

