मोठी बातमी: बीडच्या पाटोदा-मांजरसुभा रोडवर भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू
Beed: अपघातस्थळी पोलीस दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
Beed News; बीड जिल्ह्याचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातीची बातमी ताजी असतानाच, बीडच्या पाटोदा-मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. स्विफ्ट कार आणि टेम्पोचा झालेला हा अपघात एवढा भीषण होता की 6 जणांचा यात मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा -मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ बामदळे वस्ती येथे स्विफ्ट डिझायर कार-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाल्याचे दिसून येतो. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.
मोठा आवाज...
स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पोची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असल्याचे समोर येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, जोराचा आवाज झाला. त्यांनतर रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांनी अपघात झालेल्या दोन्ही गाड्यातील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
असा झाला अपघात...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कारमधून पुण्यातील कुटुंब आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जीवाचीवाडी इथे जात होते. दरम्यान पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्यादरम्यान अचानक त्या स्विफ्ट आणि आयशरमध्ये जोरदार धडक झाली. दोन्ही गाड्यांचा वेग जास्त असल्याने स्विफ्टचा समोरचा भाग चुरा झाला आहे.
गाडीमधील लोकांचा चंदामेंदा
थेट समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातानंतर रस्त्यावर सुरु असलेली वाहतूक थांबली. तर अपघातानंतर आतमध्ये अडकलेल्या व्यक्तींना इतर वाहनधारकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र यावेळी गाडीमधील लोकांच्या शरीराचा अक्षरशः चंदामेंदा झालेला होता. त्यांनतर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस हजर झाले होते. सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढत रुग्णालयात हलवली.
अपघातांनी बीड जिल्हा हादरला...
बीड जिल्ह्याचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताच्या बातमीने बीड जिल्हाला हादरला असतानाच, अचानक आणखी एका अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली. पहाटे मेटे यांच्या गाडीला मुंबईला जातांना अपघात झाला. ज्यात त्याचं निधन झाले. त्यामुळे बीड जिल्ह्यावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. त्यातून सावरत नाही तो बीडच्या एका लग्नासाठी येणाऱ्या कुटुंबातील 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे बिडकरांसाठी आजचा दिवस अपघातवार ठरला.