एक्स्प्लोर

'विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू'; बड्या नेत्याच्या गंभीर आरोपाने खळबळ

Radhakrishna Vikhe Patil and Sujay Vikhe Patil : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिर्डीतील बड्या नेत्याने विखे पाटलांवर गंभीर आरोप केलाय.

शिर्डी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपमधील (BJP) अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी (Shirdi Vidhan Sabha Constituency) इच्छुक असलेले भाजपचे डॉ. राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

विखे पाटलांमुळे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात भाजपची अधोगती झालीय. विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू असून या विंचवाला मारायचं असेल तर ती चप्पल महादेवाला लागते, अशी भाजप नेत्यांची अवस्था झाली असल्याचा गंभीर आरोप राजेंद्र पिपाडा यांनी राहाता शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

विखे पाटलांविरोधात लढवली होती निवडणूक

भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत विखे पाटलांच्या कार्यशैलीबाबत आक्षेप घेत टीका केली होती. यानंतर त्यांच्याच सांगण्यावरून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप पिपाडा यांनी केलाय. 2009 साली डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. अत्यंत चुरशीची ठरलेल्या त्या निवडणुकीत पिपाडा यांचा अवघ्या 13 हजारच्या फरकाने पराभव झाला होता. 

राजेंद्र पिपाडा यांनी विखे पाटील पिता-पुत्रांविरोधात ठोकला शड्डू 

2019 साली काँग्रेसला रामराम करत विखे पाटीलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पिपाडा आणि विखे पाटील या कट्टर विरोधकांचे मनोमिलन घडवण्यात त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आले होते. मात्र, आता पुन्हा पिपाडा यांनी विखे पाटील पिता - पुत्रांविरोधात शड्डू ठोकलाय. विखे पाटील हे भाजपच्या नेत्यांनाच त्रास देत असून ते पक्षात आल्यानंतर पक्षाची अधोगती झाल्याचे पिपाडा यांनी म्हटले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपच्या पाच आमदारांचा पराभव झाला तर या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) शिर्डी आणि नगर लोकसभा गमवावी लागल्याचाही गंभीर आरोप पिपाडा यांनी केला आहे. आता पिपाडा यांच्या टीकेवर विखे पाटील नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

लाडकी बहीण ही तर कॉपी पेस्ट योजना रोहित पवारांची टीका; विखे पाटील म्हणतात, विरोधकांना....

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या स्टेजवर, विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget