Jayant Patil : निलेश लंकेंनी वात पेटवलीय, लवकरच आणखी आमदार मविआत परतणार; जयंत पाटलांच्या भाकिताने चर्चांना उधाण
Jayant Patil : निलेश लंके यांनी सुरुवात केली आहे. आता इतरही आमदार हळूहळू मविआत येतील, असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagar Lok Sabha : निलेश लंके (Nilesh lanke) यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Ahmednagar Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून (NCP Sharad Pawar) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके (Sujay Vikhe Patil vs Nilesh Lanke) यांच्यात लढत होणार आहे. निलेह लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज करण्यात आला. या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या भाकिताने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, संविधान टिकवण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) काम करत आहे. महाविकास आघाडीत काही प्रश्न मतभेद तयार होतील, असा प्रयत्न अनेकांनी केला. पण सध्या मविआने चांगलं वातावरण राज्यात बनवले आहे, असे त्यांनी म्हटले.
निलेश लंकेंनी सुरुवात केली, इतरही आमदार मविआत परतणार
मविआचे नगरचे उमेदवार निलेश लंके हे मनाने नेहमीच शरद पवारांसोबत होते ते आता प्रत्यक्ष आमच्यासोबत काम करत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. निलेश लंके यांनी सुरुवात केली आहे. आता इतरही आमदार हळूहळू मविआत येतील, असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
निलेश लंकेंमध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याची खुबी
कार्यकर्त्यांमधला उत्साह पाहून नगर दक्षिणचा निकाल आजच झालाय असं वाटतंय. लोकांनी एखादा निर्णय घेतला तर जगातील कोणतेही ताकद रोखू शकत नाही. सर्वसामान्य जनतेचा आवाज दिल्लीत पोहचवण्यासाठी निलेश लंके यांना दिल्लीत पाठवणे गरजेचे आहे. निलेश लंके यांच्यात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याची खुबी आहे. नगर दक्षिणमधील सर्व घटकांना न्याय द्यायचा असेल तर निलेश लंके यांना निवडून द्या, असेही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांची भाजपवर टीका
काही लोक म्हणत होते की, कामं करून घेण्यासाठी आम्ही तिकडे (अजित पवार गटात) जात आहोत पण कोणत्या विचाराच्या मागे राहून आपण कामं करून घेतो हे महत्वाचे आहे. हजारो कोटी रुपये जो पक्ष जाहिरातीवर खर्च करतो त्याची मिळकत काय असेल? याचा तुम्ही विचार करा. इलेक्ट्रोल बॉण्ड म्हणजे मोठा भ्रष्टाचार आहे. काँग्रेसने मागील 70 वर्षात काय केलं नाही हे भाजप सांगत आहे. पण 10 वर्षांपासून तुम्ही काय केलं ते तर सांगा. या देशात बेरोजगारी वाढली आहे. उच्च शिक्षित तरुण शिपायाच्या पदावर नोकरी मिळावी म्हणून रांगेत उभा राहतोय. कोरोना काळात 50 लाख लोक मृत्यूमुखी पडले ही तुमची कर्तबगारी आहे का? असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर टीका आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
