Ramesh Baraskar : लग्नापासून 'वंचित' असलेल्यांना आंबेडकरांच्या माढ्यातील उमेदवाराची खास ऑफर, म्हणाला, निवडणुकीत मतं द्या, मग...
Ramesh Baraskar, Madha Loksabha : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला.
Ramesh Baraskar, Madha Loksabha : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला. ओबीसी समाजाच्या वतीने मी प्रकाश आंबेडकर आभार व्यक्त करतो. माढा मतदारसंघातील मुद्दे घेऊन मी निवडणूक लढेल. तरुणांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या वजनकाटाच्या प्रश्न या मतदारसंघात आहे. पाण्याचा प्रश्न आहे. महिलांच्या हाताला काम नाही. तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही. ज्या वयात लग्न करायचं त्या वयात तरुणांची लग्न होत नाहीत. तीस वय झालं, चाळीशी पार झाली तरीही तरुणांची लग्न होत नाहीत. हा प्रश्न माढा मतदारसंघातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. या प्रश्नावर प्रामुख्याने मी काम करणार आहे.
धनगर समाजाचे मतदान जवळपास साडेचार लाख
रमेश बारस्कर म्हणाले, माढा मतदारसंघात 2 विधानसभा एससी समुहाच्या आहेत. माळशीरस आणि फलटण तालुक्यात जवळपास 18 टक्के लोकसंख्या एससी समाजाची आहे. त्यामुळे जवळपास साडेतीन लाख मतदारस एससी समाजातून येतो. माळी समाजाचा अडीच लाख मतदार आहे. मायक्रो ओबीस अडीच लाख आहे. मुस्लीम समाज दीड लाख आहे. धनगर समाजाचे मतदान जवळपास साडेचार लाख आहे. ओपनचं मतदान पाच लाखांच्या पुढे आहे. ओबीसी बहुल हा मतदारसंघ आहे. सध्या ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलंय. त्यामळे समाज जागा झालाय. माढात ओबीसींची परिषद घेऊन आम्ही आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे. आमच्या भूमिकेला सर्व समाज पाठिंबा देतील, अशी अपेक्षाही वंचितचे माढा लोकसभेचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी दिलं आहे.
आरक्षणवादी सर्व समाज एका बाजूला विभागाला गेला
पुढे बोलताना रमेश बारस्कर म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात कोणाची अडचण करण्यासाठी नसून जिंकण्यासाठी वंचित ही निवडणूक लढवणार आहे. मनोज जरंगे यांच्या आंदोलनामुळे समाजात उभी फूट पडली असून आरक्षणवादी सर्व समाज एका बाजूला विभागाला गेला आहे. मनोज जरंगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसींची ताकद या निवडणुकीत दिसून येणार असून लहान लहान गावापर्यंत ओबीसी समाजाच्या मतदारांत मोठी जागृती झाल्याचा दावा बारसकर यांनी केला आहे. आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडताना आरक्षणात मराठ्यांचे ताट वेगळे व ओबीसी ताट वेगळे ठेवण्याची भूमिका घेतली होती.
ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास सगळ्या ओबीसी समाजाचा विरोध
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता. मात्र ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास सगळ्या ओबीसी समाजाचा विरोध होता. राज्यात वेगळे काही समीकरण बनते आहे का? हे पाहण्यासाठी जरांगे यांनी आंबेडकर यांची भेट घेतली असली तरी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ओबीसी मतांची ताकद निकालानंतर दिसून येणार असून राज्यातील वंचितांचा पहिला गुलाल माढा मधून दिसेल, असे बारसकर यांनी सांगितले .
मोहिते पाटील यांची भूमिका अजून तळ्यात मळ्यात असल्याने लोकात संभ्रम आहे. आपल्या उमेदवारीमुळे भाजपकडे गेलेला ओबीसी समाज वंचितांच्या मागे येईल. राष्ट्रवादीकडे गेलेला अनुसूचित जातींचा मतदार पुन्हा प्रकाश आंबेडकर यांच्या मागे आलेला दिसेल, असा दावा केला आहे . त्यामुळे वंचितांच्या उमेदवारीचा फटका भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांना बसून विजय वंचितांचा होईल, असंही बारस्कर यांनी म्हटलं.
इतर महत्वाच्या बातम्या