एक्स्प्लोर

New Year पार्टीसाठी गोव्याला जायचंय? साऊथ गोव्यातील 'ही' ठिकाणं, जी कमी लोकांना माहित, एकदा भेट द्याल तर टेन्शन विसराल!

New Year Travel: ख्रिसमस-न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही मित्रमंडळी-कुटुंबासोबत गोव्याला जात असाल, तर यंदा साऊथ गोव्यातील 'ही' ठिकाणं एक्सप्लोर करायला विसरू नका..

New Year Travel: 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात ख्रिसमस-न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही कुठेतरी फिरायचा प्लॅन करताय? तसं पाहायला गेलं तर या दिवसात फिरायचं म्हटलं तर गोवा हे असं ठिकाणं आहे, ज्याचं नाव सर्वात पुढे असतं. कारण गोव्यात डिसेंबर महिना अगदी खास असतो. कारण ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टी म्हटलं तर जवळजवळ प्रत्येकजण गोव्याचे नाव घेतो. अरबी समुद्राच्या किना-यावर वसलेले गोवा हे असे पर्यटन केंद्र आहे की जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि परदेशी पर्यटकही मौजमजा करण्यासाठी येत असतात. त्यामुळेच गोव्याला पार्टी डेस्टिनेशनचे केंद्र मानले जाते. जर तुम्हीही गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला साऊथ गोव्यातील काही अशी ठिकाणं सांगत आहोत. जिथे गेल्यानंतर तुमचा मूड अगदी फ्रेश होईल..

साऊथ गोवा देखील सुंदर खजिन्यापेक्षा कमी नाही...

जेव्हा गोव्यात प्रवास आणि मजा करण्याचा विचार येतो तेव्हा बरेच लोक उत्तर म्हणजेच नॉर्थ गोव्याचा उल्लेख करतात, कारण त्यात शहरी भाग आणि काही प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत, परंतु तुम्हाला माहितीय का? दक्षिण म्हणजेच साऊथ गोवा देखील एका सुंदर खजिन्यापेक्षा कमी नाही. आज आम्ही तुम्हाला दक्षिण गोव्यातील काही अप्रतिम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही ख्रिसमसपासून ते नवीन वर्षापर्यंत मस्त पार्टीचा आनंद घेऊ शकता.

New Year पार्टीसाठी गोव्याला जायचंय? साऊथ गोव्यातील 'ही' ठिकाणं, जी कमी लोकांना माहित, एकदा भेट द्याल तर टेन्शन विसराल!

पालोलेम बीच

दक्षिण गोव्यातील कोणत्याही प्रेक्षणीय आणि प्रसिद्ध ठिकाणाला भेट देण्याचा विचार आला की, बरेच लोक प्रथम पालोलेम बीचच्या किनाऱ्यावर पोहोचतात. हा समुद्रकिनारा केवळ दक्षिण गोव्यातच नव्हे तर उत्तर, पूर्व पश्चिम आणि दक्षिण गोव्यातही अव्वल स्थान मानला जातो. पालोलेम बीच आपल्या सौंदर्यासोबतच पार्टी डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने हजारो लोक मौजमजा करण्यासाठी पालोलेम बीचच्या किनाऱ्यावर पोहोचतात. अनेक खास प्रसंगी या समुद्रकिनाऱ्यावर कार्यक्रमही आयोजित केले जातात. पालोलेम बीचवर अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही नवीन वर्षाची पार्टी देखील करू शकता.

New Year पार्टीसाठी गोव्याला जायचंय? साऊथ गोव्यातील 'ही' ठिकाणं, जी कमी लोकांना माहित, एकदा भेट द्याल तर टेन्शन विसराल!

अवर लेडी ऑफ रेमेडिओज चर्च

अवर लेडी ऑफ रेमेडिओस चर्च हे संपूर्ण गोव्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चर्च आहे. हे चर्च गोव्यातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध चर्च मानले जाते. हे चर्च 16 व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. ख्रिसमसच्या निमित्ताने अवर लेडी ऑफ रेमेडिओज चर्चच्या आसपास खूप क्रियाकलाप आहेत. या विशेष प्रसंगी चर्च दिव्यांनी सजवण्यात आले आहे. अनेक वेळा नाताळच्या निमित्ताने चर्चमध्ये नाच-गाणे सुरू असते, जे नवीन वर्षापर्यंत सुरू असते.

New Year पार्टीसाठी गोव्याला जायचंय? साऊथ गोव्यातील 'ही' ठिकाणं, जी कमी लोकांना माहित, एकदा भेट द्याल तर टेन्शन विसराल!

अगोंडा बीच

दक्षिण गोव्यातील पालोलेम बीचला भेट दिल्यानंतर तुम्ही अगोंडा बीचवर जाऊ शकता. हा देखील दक्षिण गोव्याचा एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे, जेथे कोणत्याही विशेष प्रसंगी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी आणि मजा करण्यासाठी येतात. अगोंडा बीच हा त्याच्या सौंदर्यासाठीही ओळखला जातो. समुद्रकिनाऱ्यावरून तुम्ही अरबी समुद्राच्या सुंदर लाटा कॅमेऱ्यात टिपू शकता. समुद्रकिनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य देखील अप्रतिम आहे. येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता.

New Year पार्टीसाठी गोव्याला जायचंय? साऊथ गोव्यातील 'ही' ठिकाणं, जी कमी लोकांना माहित, एकदा भेट द्याल तर टेन्शन विसराल!

दूधसागर धबधबा

दक्षिण गोव्यातील दूधसागर धबधबा हे एक असे ठिकाण आहे ज्याबद्दल जवळजवळ प्रत्येक साहसप्रेमीला माहिती असेल. हा धबधबा केवळ गोव्यासाठीच नाही तर सीमेजवळ असलेल्या कर्नाटकसाठीही प्रमुख पर्यटन केंद्र मानला जातो. दूधसागर धबधब्यात सुमारे 1000 फूट उंचीवरून पाणी जमिनीवर पडल्यावर आजूबाजूचे दृश्य केवळ पाहण्यासारखे असते. या धबधब्याजवळून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा ते दृश्य आणखीनच सुंदर दिसते. दूधसागर धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर त्याच्या सौंदर्यासाठी तसेच साहसी उपक्रमांसाठी ओळखला जातो.

साऊथ गोव्यातील ही ठिकाणं देखील एक्सप्लोर करा, टेन्शन विसराल!

दक्षिण गोव्यात इतर अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणे आहेत, जी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तुम्ही कोल्वा बीच, कोटिगाव वन्यजीव अभयारण्य, कालोलेम बीच आणि इंडियन नेव्हल एव्हिएशन म्युझियम सारखी ठिकाणे देखील एक्सप्लोर करू शकता.

हेही वाचा>>>

Winter Travel: हिवाळ्यात महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशन्ससमोर शिमलाही दिसेल फिका! अद्भूत दृश्य स्वर्गापेक्षा कमी नाही...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget