एक्स्प्लोर

Winter Travel: हिवाळ्यात महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशन्ससमोर शिमलाही दिसेल फिका! अद्भूत दृश्य स्वर्गापेक्षा कमी नाही...

Winter Travel: हिवाळ्यात महाराष्ट्रातील मनमोहक हिल स्टेशन्सना तुम्ही डेस्टिनेशन पॉइंट बनवू शकता. हे हिल स्टेशन्स एक्सप्लोर करणं स्वर्गापेक्षा कमी नाही. 

Winter Travel: सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरूय. जर तुम्हाला फिरायचं असेल तर नोव्हेंबर आणि डिसेंबर हा महिना अगदी उत्तम समजला जातो. आणि त्यात महाराष्ट्रात फिरण्याचा विचार केला तर बरेच लोक फक्त पावसाळी ट्रीपला प्राधान्य देतात. पावसाळ्यात महाराष्ट्रातील काही ठिकाणांचे सौंदर्य अगदी अप्रतिम असते, पण तुम्हाला माहितीय का? हिवाळ्यातही हे सौंदर्य काही कमी नाही. जर तुम्ही हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर शिमला, मनाली विसराल अशी हिल स्टेशन महाराष्ट्रातही आहेत. राज्यातील या भव्य आणि मनमोहक हिल स्टेशन्सना तुम्ही डेस्टिनेशन पॉइंट बनवू शकता. 

महाराष्ट्रात अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणं

महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त अशी अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणे आहेत, जिथे हिवाळ्यात भेट दिल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटेल. महाराष्ट्रातील हिल स्टेशन्स एक्सप्लोर करणे हे एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही मनमोहक आणि सुंदर हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत, जेथे थंडीच्या मोसमात भेट दिल्यावर तुमचे मन प्रसन्न होईल

हिवाळ्यात माथेरानचे सौंदर्य पाहण्यासारखे

महाराष्ट्रात वसलेल्या कोणत्याही भव्य आणि लोकप्रिय हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार आला की, बरेच लोक प्रथम माथेरानकडे वळतात. माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे, जेथे दररोज अनेक पर्यटक येतात. निसर्गप्रेमींसाठी माथेरान हिल स्टेशन हे निसर्गरम्य वातावरण, सुंदर दृश्ये आणि समृद्ध इतिहासाने नंदनवन मानले जाते. हिवाळ्यात माथेरानचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. माथेरान हे त्याच्या सौंदर्यासोबतच साहसी उपक्रमांसाठीही ओळखले जाते. अनेक पर्यटक फक्त ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी येतात.

महाबळेश्वर - सर्वोत्तम आणि लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे. हे सुंदर हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 4 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेले आहे. ढगांनी आच्छादलेले उंच पर्वत, घनदाट जंगले, गवताळ प्रदेश आणि तलाव आणि धबधबे महाबळेश्वरच्या सौंदर्यात भर घालतात. हिवाळ्यात अनेक लोक पिकनिक आणि ट्रेकिंगसाठी येतात. महाबळेश्वरमध्ये तुम्ही मॅप्रो गार्डन, वेण्णा लेक, महाबळेश्वर मंदिर आणि विल्सन पॉइंट सारखी अद्भुत ठिकाणे पाहू शकता.

पाचगणी - देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे

पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करते. हे महाबळेश्वरपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. पाचगणी हा महाराष्ट्राचा लपलेला खजिनाही मानला जातो. पाचगणी हिल स्टेशन हे साहसप्रेमींसाठी नंदनवन मानले जाते. पाचगणीचे खरे सौंदर्य पावसाळ्यात पाहायला मिळत असले तरी हिवाळ्यातही त्याचे सौंदर्य पाहायला मिळते. हिवाळ्याच्या काळात पाचगणीचे तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली जाते. हिवाळ्यात पर्वत ढगांनी झाकलेले असतात.

लोणावळा - साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवन 

लोणावळा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. लोणावळा सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेले आहे. हे सुंदर हिल स्टेशन पुण्याच्या मुख्य शहरापासून सुमारे 60 किमी आणि मुंबईपासून सुमारे 96 किमी अंतरावर आहे. लोणावळा हे साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवन मानले जाते. येथील शांत वातावरणही पर्यटकांना खूप आकर्षित करते. लोणावळ्यात तुम्ही टायगर पॉइंट, भाजा लेणी आणि भुशी डॅम सारखी अद्भुत ठिकाणे पाहू शकता. हिवाळ्यात येथील तापमान 12 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहते.

इगतपुरी - शांत आणि शुद्ध वातावरण असलेले हिल स्टेशन 

महाराष्ट्रातील इगतपुरी हे सर्वात शांत आणि शुद्ध वातावरण असलेले हिल स्टेशन मानले जाते. पश्चिम घाटात वसलेले इगतपुरी नाशिकपासून 45 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. इगतपुरीमध्ये तुम्ही थल घाट, घाटनदेवी मंदिर आणि रतनगड किल्ला यासारखी ठिकाणे पाहू शकता. इगतपुरीत फिरण्याव्यतिरिक्त तुम्ही रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग आणि कॅम्पिंग देखील करू शकता.

हेही वाचा>>>

Maharashtra Hidden Places: 'अरेच्चा..! महाराष्ट्रात लपलेले 'हे' सुंदर हिल स्टेशन माहितच नव्हते!' अनेकांच्या नजरेपासून दूर, एकदा बघाल तर प्रेमातच पडाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget