![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cancer Cell Detection: 'हे' नवीन उपकरण रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधू शकते, मोठी शस्त्रक्रिया टाळण्यास होईल मदत
Science News: असं एक उपकरण बनवण्यात आलं आहे, जे रक्ताच्या नमुन्यांमधून कर्करोगाच्या पेशी शोधून त्यांचे विश्लेषण करू शकते. यामुळे बायोप्सी शस्त्रक्रिया करण्याची शक्यता कमी होऊ शकते.
![Cancer Cell Detection: 'हे' नवीन उपकरण रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधू शकते, मोठी शस्त्रक्रिया टाळण्यास होईल मदत Static Droplet Microfluidic new device can kill cancer cells in the blood avoiding major surgery Cancer Cell Detection: 'हे' नवीन उपकरण रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधू शकते, मोठी शस्त्रक्रिया टाळण्यास होईल मदत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/4b89c144ccf8c1dc69260c8cd98089381677599978022384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Science News: आज तंत्रज्ञान खूप विकसित झालं आहे. काही काळापूर्वी ज्या गोष्टी माणसाला शक्य नव्हत्या, त्या आता हळूहळू तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे. अशातच आता असं एक उपकरण बनवण्यात आलं आहे, जे रक्ताच्या नमुन्यांमधून कर्करोगाच्या पेशी शोधून त्यांचे विश्लेषण करू शकते. यामुळे बायोप्सी शस्त्रक्रिया करण्याची शक्यता कमी होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी विकसित केलेले हे उपकरण डॉक्टरांना उपचार प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास मदत करू शकते. या उपकरणाबद्दल नुकतीच बायोसेन्सर्स आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स जर्नलमध्ये माहिती प्रकाशित झाली आहे. युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, 2022 मध्ये भारतात कर्करोगाच्या घटनांची अंदाजे संख्या 14,61,427 असल्याचे आढळून आले आहे. देशातील नऊपैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे या सांगण्यात आले आहेत.
Cancer Cell Detection: सध्या या तंत्रज्ञानाद्वारे केलं जातं कर्करोगाचे निदान
एनआयएचच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेनुसार, सध्या कर्करोगाचे निदान तीन प्रकारे केले जाते. ज्यात प्रयोगशाळा चाचण्या, इमेजिंग चाचण्या आणि बायोप्सीचा समावेश आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याला कर्करोग झालं असल्याचा संशय येतो, तेव्हा त्याच्या निश्चित निदानासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
Cancer Cell Detection: नवीन उपकरणाचे नाव काय आहे?
या उपकरणाचं नाव 'स्टॅटिक ड्रॉपलेट मायक्रोफ्लुइडिक' (Static Droplet Microfluidic) आहे. हे उपकरण रक्ताभिसरण करणाऱ्या ट्यूमर पेशींचा वेगाने शोध घेऊ शकतो, जे ट्यूमरपासून दूर गेले आहेत आणि रक्तप्रवाहात प्रवेश करतात. ट्यूमर पेशींना सामान्य रक्तपेशींपासून वेगळे करण्यासाठी हे उपकरण कर्करोगाच्या मेटाबॉलिक चिन्हाचा वापर करते.
Cancer Cell Detection: नवीन उपकरण कसे काम करते?
याबाबत माहिती देताना सिडनी तंत्रज्ञान विद्यापिठातील डॉ. माजीद वरकियानी म्हणाले आहेत की, ''1920 मध्ये जर्मन फिजियोलॉजिस्ट Otto Heinrich Warburg आणि 1931 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्तकर्ते यांनी शोधून काढले की कर्करोगाच्या पेशी खूप जास्त ग्लुकोज वापरतात आणि त्यामुळे अधिक लॅक्टेट तयार होते, जे निसर्गात अम्लीय आहे.'' वरकियानी यांनी स्पष्ट केले की, हे यंत्र पेशींच्या आसपास आम्लता शोधणारे pH संवेदनशील फ्लोरोसेंट रंग वापरून वाढलेल्या लैक्टेटसाठी एकल पेशींचे निरीक्षण करते.
वरकियानी म्हणाले की, फक्त एक लीटर रक्ताच्या कोट्यवधी रक्त पेशींमध्ये एक ट्यूमर सेल असू शकतो. यामुळे ट्यूमर पेशी शोधणे कठीण होते. वरकियानी यांनी स्पष्ट केले की, नवीन शोध तंत्रज्ञानामध्ये 38,400 चेंबर्स आहेत, जे मेटाबॉलिकदृष्ट्या सक्रिय ट्यूमर पेशींची संख्या वेगळे आणि वर्गीकृत करण्यास सक्षम आहेत. या उपकरणाने ट्यूमर पेशी ओळखल्यानंतर अनुवांशिक आणि आण्विक विश्लेषण केले जाते. हे कर्करोगाचे निदान आणि वर्गीकरण करण्यात मदत करू शकते आणि डॉक्टरांना वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यात मदत करू शकते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)