Cancer: काय सांगता! कर्करोग बरा झाल्यानंतरही पुन्हा सक्रिय होऊ शकतो? संशोधनात धक्कादायक बाब समोर, जाणून घ्या..
Cancer: नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कर्करोगाचे काही प्रकार आहेत जे पहिल्या उपचारात बरे झाल्यानंतर काही वर्षांत पुन्हा सक्रिय होऊ शकतात.
Cancer: आजकाल आपण पाहतो, कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतेय. आजकालची बदलती जीवनशैली, अनहेल्दी खाणं, वाईट सवयींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे. या आजारावर जगभरात संशोधन होत आहे. स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग इत्यादी कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. हा आजार एक आव्हानात्मक आजार आहे, ज्यामध्ये जीवाला धोका असतो. स्तनाचा कर्करोग हा देखील एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्याची प्रकरणे जगभरात वाढत आहेत. जगभरातील आरोग्य विभागांमध्ये कर्करोगाबाबत अभ्यास सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कर्करोगाचे काही प्रकार आहेत, जे पहिल्या उपचारात बरे झाल्यानंतर काही वर्षांत पुन्हा सक्रिय होऊ शकतात. हे प्रामुख्याने स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होते. या संशोधनाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
हे संशोधन कुठे झाले आहे?
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले, डॉ. गॅरी लुकर यांच्या नेतृत्वाखाली ब्रेस्ट कॅन्सरवर हे संशोधन करण्यात आले. त्यांच्या संशोधनात त्यांनी हे अधोरेखित केले आहे की, काही प्रकारचे स्तन कर्करोग ज्यावर आधी उपचार केले गेले आहेत, ते काही वर्षांनी पुन्हा सक्रिय होऊ शकतात. यामुळे हा आजार पुन्हा होऊ शकतो, विशेषत: ज्या रुग्णांना इस्ट्रोजेन रिसेप्टर-पॉझिटिव्ह स्तनाचा कर्करोग आहे.
अभ्यास काय सांगतो?
संशोधनानुसार, डॉ. गॅरी ल्यूकर मानतात की, कर्करोगाच्या उपचारादरम्यान, लोक बहुतेकदा असे विचार करतात की ते रोगापासून बरे झाले आहेत, परंतु या प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगात, इस्ट्रोजेन रिसेप्टर-पॉझिटिव्ह रुग्णांच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये असामान्य वाढ होते, या कर्करोगाच्या पेशी उपचारानंतरही अस्तित्वात राहतात, ज्यामुळे काही वर्षांनी हा आजार पुन्हा होतो.
GIV म्हणजे काय?
संशोधनाने GIV किंवा Girdin नावाचे प्रमुख प्रोटीन देखील ओळखले आहे, जे कर्करोगाच्या पेशी जिवंत ठेवण्यास मदत करते.
कर्करोग टाळण्यासाठी मार्ग
दरम्यान हे संशोधन अद्याप पूर्णपणे योग्य मानले जात नाही. यावर अजून अभ्यासाची गरज आहे, मात्र काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, ज्यामुळे आपण कॅन्सर सारख्या आजारांपासून दूर राहू शकतो. यासाठी चांगला आणि सकस आहार घ्यावा. संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि अँटिऑक्सिडंट्स खावे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येऊ नका. यासाठी चेहरा आणि त्वचेवर सन प्रोटेक्शन वापरा. उन्हात सनग्लासेस घाला. शारीरिक संबंध ठेवतानाही काळजी घ्या.
हेही वाचा>>>
Heart Attack चा धोका कोणाला जास्त? शाकाहारी की मांसाहारींना? लठ्ठ कि पातळ लोकांना? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )