एक्स्प्लोर
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
Motilal Nagar redevelopment in Mumbai: मुंबई शहरातील महत्त्वाच्या आणि अनेक विकसकांचा डोळा असलेल्या मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले आहे.
Motilal Nagar redevelopment Adani Group
1/10

धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगावमधील मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. 143 एकरवर असलेल्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक 36 हजार कोटींची बोली लावली आहे.
2/10

या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29 टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3 लाख 83 हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78 टक्के अर्थात 3 लाख 97 हजार 100 चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.
3/10

लवकरच निविदा अंतिम करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार
4/10

या पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी समूहाला विक्रीसाठी 18 लाख 80 हजार चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होईल.
5/10

या पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी समूहाला विक्रीसाठी 18 लाख 80 हजार चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होईल.
6/10

मोतीलाल नगर-1, 2 आणि 3 हा मुंबईतील सर्वात मोठ्या निवासी पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने (एपीपीएल) सर्वात मोठी बोली लावली. प्रतिस्पर्धी कंपनी एल अँड टीच्या तुलनेत अधिक निर्मिती क्षेत्राचा प्रस्ताव अदानी प्रॉपर्टीजकडून मांडण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प अदानी समूहाला मिळाला.
7/10

धारावी, वांद्र रेक्लमेशनपाठोपाठ मुंबईतील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अदानी समूहाकडे गेला आहे. गोरेगाव पश्चिम येथील 142 एकरांवरील मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची आर्थिक निविदा मंगळवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून खुली करण्यात आली. या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली.
8/10

गोरेगावच्या मोतीलाल नगरमध्ये 3700 गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन एकूण 5 लाख 84 चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे.
9/10

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा लौकिक असणाऱ्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडूनच केला जात आहे. याशिवाय, एमएसआरडीसीच्या अखत्यारितील वांद्रे रेक्लमेशन परिसराचा पुनर्विकासही अदानी समूहाकडे आहे.
10/10

तसेच अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विक्री करायच्या इमारतीचे बांधकाम अदानी समूहाला मिळाले आहे.
Published at : 12 Mar 2025 08:12 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
























