एक्स्प्लोर

Yuvraj Singh and Virat Kohli : युवराज सिंग-विराट कोहली यांच्यात वाद? 'या' पोस्टमुळे भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा उडाली खळबळ! युवी म्हणतो...

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या कंपनीचे जगभरात कौतुक होत आहे.

IND vs NZ Final Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या कंपनीचे जगभरात कौतुक होत आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने संघ म्हणून चॅम्पियनशिप कशी जिंकली जाते याचे उदाहरण सादर केले. यादरम्यान, एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने टीम इंडियाच्या जवळजवळ प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले, परंतु त्याच्या पोस्टवरून एका खेळाडूचे नाव गायब होते, ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियासाठी दोन सामन्यांमध्ये शानदार खेळी खेळली होती.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 100 धावांची नाबाद खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक हुकले असले तरी, त्या सामन्यात टीम इंडियाकडून ती सर्वोच्च धावसंख्या होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने 84 धावांची शानदार खेळी केली. 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या. अशा परिस्थितीत, युवराजच्या पोस्टवरून कोहलीचे नाव गायब होणे, हे कोहली आणि सिक्सर किंगमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे संकेत देते.

युवराज सिंगने पोस्टमध्ये काय लिहिले?

युवराज सिंगने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, "किती छान फायनल होती... चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आली... 'हिटमॅन' रोहित शर्माचे उत्कृष्ट कर्णधारपद, ज्याने संपूर्ण स्पर्धेत एका महान लीडरप्रमाणे संघाचे नेतृत्व केले. आयसीसी स्पर्धांबद्दल बोलायचे झाले तर रोहित वेगळ्याच लयीत आहे."

युवी पाजी पुढे लिहितात, "संघावर दबाव असताना श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी जबाबदारी घेतली. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी संपूर्ण स्पर्धेत आपली फिरकी जादू दाखवली. मोहम्मद शमीनेही सातत्य दाखवले, पण न्यूझीलंडचे नशीब पुन्हा एकदा वाईट ठरले."

युवराज सिंगने विराट कोहलीचे नाव घेतले नाही किंवा त्याला त्याच्या पोस्टमध्ये टॅग केले नाही. तर युवीने त्याच्या पोस्टमध्ये रोहित शर्मापासून वरुण चक्रवर्तीपर्यंत सर्वांची नावे घेतली. युवराज सिंगच्या या पोस्टनंतर चाहते असा अंदाज लावत आहेत की सिक्सर किंग युवराज सिंग आणि रन मशीन विराट कोहली यांच्यात काही मतभेद सुरू आहेत.

हे ही वाचा -

Jay Shah News : 'मी जय शहांचा PA...', असं सांगून जगायचा लक्झरी लाईफ, BCCI चं कार्डही बनवलं; पण, अखेर सत्य समोर येताच सर्व हादरले!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Embed widget