Yuzvendra Chahal RJ Mahvash: टीम इंडियाची मॅच सुरू असताना युजवेंद्र आणि आरजे महावश यांचं लिपलॉक किसिंग? 'तो' VIDEO व्हायरल
Yuzvendra Chahal RJ Mahvash Video: युजवेंद्र चहल आणि आरजे महावश टीम इंडियाच्या सामन्यावेळी स्पॉट झाल्यानंतर बरीच चर्चा रंगली, अशातच आता एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal RJ Mahvash Video: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या चर्चेत आहे. पत्नी धनश्रीसोबतच्या (Dhanashree Varma) त्याच्या घटस्फोटानंतर चर्चांना उधाण आलं होतं. अशातच युजवेंद्र आणि धनश्री पॉवर कपल मानलं जात होतं. पण, दोघांच्याही वेगळं होण्याच्या चर्चांनी चाहत्यांना मोठा धक्का बसला. अशातच सध्या युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघे वेगळे झाले असून दोघांच्याही क्रिप्टीक पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. अशातच युजवेंद्र चहल पुन्हा चर्चेत आला आहे तो, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाल्यामुळे. ती मिस्ट्री गर्ल म्हणजे, आरजे महावश (RJ Mahvash). दोघेही मॅच पाहताना स्पॉट झाल्यामुळे चर्चेचा विषय झाले आहेत.
युजवेंद्र, महावशचा VIDEO Viral
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनश्री आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोट झाल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. या सगळ्यात दुबईमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत चहल आरजे महावशसोबत स्पॉट झाला. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे धनश्रीसोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल आता आरजे महावशसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अशातच आता दोघांचा आणखी व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहल आणि आरजे महावश एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
व्हायरल VIDEO खरा की, खोटा?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात युजवेंद्र चहल आणि आरजे महविश एकमेकांसोबत लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. हा व्हिडीओ खरा की, खोटा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हिडीओ AI टेक्नॉलोजीचा वापर करून बनवला आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे.
View this post on Instagram
Ind vs NZ च्या फायनलमध्ये एकत्र
युजवेंद्र चहलनं सामन्यासाठी कॅज्युअल, जीन्स आणि काळे जॅकेट घातलं होतं. आरजे महविशनं जीन्स आणि पांढरा क्रॉप टॉप घातला होता. दोघेही सामन्यावेळी एकमेकांसोबत चील करताना दिसले. मॅचनंतर आरजे महावशनं तिच्या इंस्टाग्राम वॉलवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा अनुभव शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहलही दिसत आहे.
धनश्री वर्माची क्रिप्टिक पोस्ट
युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या दोघांच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओनं लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच धनश्री वर्मासुद्धा चर्चेत आली आहे. धनश्रीनं सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. धनश्री वर्मानं म्हटलंय की, "महिलांना दोष देणं नेहमीच फॅशनमध्ये असतं..." नेटिझन्सनी तिच्या या क्रिप्टिक पोस्टचा संबंध युजवेंद्र चहल आणि आरजे महावश यांच्यासोबत जोडला आहे.
दरम्यान, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या चर्चांनंतर धनश्रीनं युजवेंद्रकडून 60 कोटी रुपयांच्या मोठ्या पोटगीची मागणी केल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. अशातच आता त्याच्या कुटुंबानं स्पष्ट केलं आहे की, युजवेंद्र चहलकडून अशा कोणत्याही पोटगीची मागणी करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मै नमक हू महाराज! के एल राहुलने टीम इंडियासाठी नेमकं काय केलं, छावा चित्रपटातील डायलॉग होतोय व्हायरल























