महिलांमध्येही वाढतेय स्ट्रोकची समस्या, कारणीभूत घटक कोणते?
महिला वर्गात आढळणारी स्ट्रोकची समस्या ही हार्मोनल बदल आणि जीवनशैलीमुळे देखील प्रभावित होते. या संबंधीत जोखीम घटक जाणून घेतल्यास प्रतिबंध आणि वेळीच उपचारास मदत होते.

महिला वर्गात आढळणारी स्ट्रोकची समस्या ही हार्मोनल बदल आणि जीवनशैलीमुळे देखील प्रभावित होते. या संबंधीत जोखीम घटक जाणून घेतल्यास प्रतिबंध आणि वेळीच उपचारास मदत होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केलेल्या 2023 च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की 2050 पर्यंत भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे 1 कोटी मृत्यू होऊ शकतात. 2021 च्या ICMR च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे आणि भारतात अपंगत्वाचे सहावे प्रमुख कारण ठरत आहे. हे आकडे चिंताजनक असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सल्लागार एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. नीरज सिंग यांनी व्यक्त केलं आहे.
मेंदूचा रक्तपुरवठा विस्कळीत झाल्यावर स्ट्रोक होतो
मेंदूचा रक्तपुरवठा विस्कळीत झाल्यावर स्ट्रोक होतो, ज्यामुळं तेथील पेशींचे नुकसान होते. हे रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळं (इस्केमिक स्ट्रोक) किंवा रक्तवाहिनी फुटल्याने रक्तस्राव झाल्याने (हेमोरेजिक स्ट्रोक) होऊ शकतो. ऑक्सिजन आणि पोषक तत्वांशिवाय मेंदूच्या मृत पावतात, ज्यामुळे कायमस्वरुपीचे नुकसान होते किंवा मृत्यू देखील होतो. अस्पष्ट बोलणे अशा समस्या येतात. लक्षात ठेवा, BEFAST (तोल जाणे, अचानक भुरकट दिसणे, एका बाजूचे तोंड वाकडे होणे, एक हात निष्क्रिय होणे, स्पष्ट बोलता न येणे) हे स्ट्रोकचे संक्षिप्त रुप आहे जे एखाद्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
माहितीचा अभाव किंवा गैरसमजूतींमुळे लोकांना स्ट्रोक विषयी फारशी माहिती नसते. जर लक्षणे लवकर कमी होत गेली तर लोक असे गृहीत धरू शकतात की कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही. परंतु स्ट्रोक व्यवस्थापनासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेणे ही काळाची गरज आहे.
महिलांमधील स्ट्रोकला कारणीभूत घटक
उच्च इस्ट्रोजेन पातळी असलेल्यांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, रक्ताच्या गुठळ्या होण्यास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. मायग्रेन, ही महिलांमध्ये एक सामान्य स्थिती जी धूम्रपान किंवा गर्भनिरोधक गोळांचा वापर हे देखील स्ट्रोकचे कारण आहेत. हे घटक महिलांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर स्ट्रोकची शक्यता निर्माण करतात. निरोगी जीवनशैली बाळगणे, अंतर्निहित आरोग्य स्थिती व्यवस्थापित करणे आणि हार्मोनल बदलांचे निरीक्षण करणे हे महिलांमध्ये स्ट्रोक टाळण्यास मदत करू शकते.
कारणीभूत घटक कोणते?
रजोनिवृत्तीनंतर हार्मोनल बदल : रजोनिवृत्तीनंतर कमी इस्ट्रोजेन पातळी हृदय आणि रक्तवाहिन्यांना प्रभावित करते ज्यामुळे स्ट्रोकचा धोका होतो. रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना अनेकदा उच्च रक्तदाबाचा त्रास होतो जो पुन्हा स्ट्रोकसाठी एक जोखीम घटक आहे.
गर्भधारणेशी संबंधित बदल : प्रीक्लेम्पसिया (उच्च रक्तदाब) आणि गर्भावस्थेतील मधुमेह स्ट्रोकला कारणीभूत ठरतात आणि वेळेवर व्यवस्थापन आणि औषधोपचारांची आवश्यकता भासते.
उच्च रक्तदाब हे वयस्कर महिलांमध्ये स्ट्रोकला कारणीभूत घटकांपैकी एक प्रमुख कारण ठरते आहे. नियमित तपासणी, व्यायाम आणि औषधांनी त्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करतील.
अनियमित हृदयाचे ठोके (अॅट्रियल फायब्रिलेशन): वृद्ध महिलांमध्ये ही एक सामान्य घटना आहे आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. स्ट्रोक रोखण्यासाठी औषधांसह योग्य उपचार आवश्यक आहेत.
धूम्रपान : रक्तवाहिन्यांवर परिणाम करते आणि रक्ताच्या गुठळ्या वाढतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. धूम्रपान सोडल्याने स्ट्रोकचा धोका टाळता येतो.
लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॅाल वाढवू शकतो, यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. दररोज व्यायाम करा, वजन नियंत्रित राखणे, पौष्टिक आहाराचे सेवन, वेळोवेळी रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॅाल पातळी तपासणे आणि तज्ञांच्या मदतीने त्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
मद्यपान : अति प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो आणि वजन वाढते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक रोखण्यासाठी अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
World Stroke Day 2024: 'ऑफिस कर्मचाऱ्यांनो सावधान! तुमच्या कामाच्या ठिकाणी स्ट्रोकचा धोका अधिक?' तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























