Shama Mohamed : रोहित शर्माबाबतच्या वक्तव्यानंतर शमा मोहम्मद यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, म्हणाल्या; 'गणित इस्लाममधून आलं'
Shama Mohamed : रोहित शर्माबाबतच्या वक्तव्यानंतर शमा मोहम्मद यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, म्हणाल्या; 'गणित इस्लामधून आलं'

Shama Mohamed Controversial Statement : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबतच्या वक्तव्यानंतर चर्चेत आलेल्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. रोहित शर्माला जाड्या म्हणणाऱ्या शमा मोहम्मद यांनी आता इस्लामबाबत भाष्य केलंय. जगभरात गणित हे इस्लाममधून आलं असल्याचा दावा शमा मोहम्मद यांनी केलाय. शमा मोहम्मद यांचं वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय. दरम्यान, या वक्तव्यानंतर शमा मोहम्मद यांची भाजपकडून खिल्ली उडवली जात आहे. भाजपने मोहम्मद यांची तुलना राहुल गांधींच्या वक्तव्यांशी केली आहे.
Well @amitmalviya there are many in Congress who can give competition to Rahul Gandhi when it comes to absurd statements but have you noticed the eerie eloquent convenient silence of the “secular brigade” of Congress ecosystem when rabid radicals targeted Mohd Shami who put… pic.twitter.com/CFK8pGw9YK
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) March 7, 2025
शमा मोहम्मद राहुल गांधींपेक्षा जास्त बालीशपणा करु इच्छित आहेत - भाजप
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शमा मोहम्मद यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित मालवीय म्हणाले, मला वाटतं की, त्यांनी ठरवलंय की काँग्रेसमध्ये केवळ राहुल गांधी बालीश वक्तव्य करु शकत नाहीत. काँग्रेसमध्ये अनेक लोक आहेत, जे राहुल गांधींपेक्षा जास्त बालीशपणा करु इच्छित आहेत. त्यांनी राहुल गांधींशी स्पर्धा सुरु केलीये, असं अमित मालवीय यांनी म्हटलंय.
शहजाद पूनावाला यांनी X लिहिलं की, काँग्रेसमध्ये बालीश वक्तव्य करणारे अनेक नेते आहेत. जे राहुल गांधींना देखील टक्कर देऊ शकतात. मात्र, तुम्ही काँग्रेसच्या 'सेक्लुयर ब्रिगेड'कडे पाहा...त्यांनी मौन धारण केलंय. कट्टरपंथीयांनी मोहम्मद शमीवर टीका केली. मात्र, शमीने देशाला प्राधान्य दिलं. रोहित शर्मा यांना त्यांचं वजन जास्त आहे म्हणून शमा मोहम्मद यांनी ट्रोल केलं. हिंदू आतंकवाद आणि सनातनला संपवण्याची भाषा करत शांततापूर्वक काम करणाऱ्या हिंदूंवर टीका केली. मात्र, त्यावेळी इस्लामी कट्टरपंथियांनी शब्द देखील काढला नाही.
"Maths has come through Islam.."
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) March 6, 2025
Now this is new! Even the most staunch Islamic scholars haven't claimed this, yet here a doctor is saying it—despite the widely known fact that mathematics existed thousands of years before Islam. pic.twitter.com/vAvFrJha4O
इतर महत्त्वाच्या बातम्या






















