(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतासाठी आनंदाची बातमी! दरवर्षी 'या' देशात 2 लाख 88 हजार तरुणांना मिळणार काम, सविस्तर माहिती एका क्लिकवर
Job Opportunities : भारतातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका देशात वर्षाला 2.88 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
Job Opportunities : जगातील पाच आर्थिक महासत्तांपैकी चौथी महासत्ता असलेल्या जर्मनीबाबत (Germany) एक मोठी बातमी समोर आली आहे. जर्मनीला कुशल कामगारांचा तुटवडा भासत आहे. दरवर्षी जर्मनीला लाखो कुशल कामगारांची गरज आहे. मात्र, अशा स्थितीत जर्मनीला लाखो स्थलांतरित नागरिकांना सामावून घ्यावे लागेल. ही बातमी भारतासाठी दिलासा देणारी ठरू शकते. कारण भारतातून मोठ्या संख्येने नागरिक जर्मनीत जातात. अलीकडेच जर्मनीनेही व्हिसाचे नियम शिथिल केले असून त्यामुळे भारतीयांना तेथे जाणे सोपे होणार आहे. तसेच बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
जर्मनीला दरवर्षी 2.88 लाख कामगारांची गरज
अहवालानुसार, जर्मनीला दरवर्षी एकूण 288,000 कामगारांची गरज भासणार आहे. त्यामुळं जर्मनीला हे कामगार बाहेरुनच आणावे लागणार आहेत. या देशातील स्थिर श्रमशक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अलिकडच्या वर्षांत नव्हे तर 2024 पर्यंत दरवर्षी 2.88 लाख स्थलांतरित नागरिकांना सामावून घेण्याची आवश्यकता असेल. येणाऱ्या काळात जर्मनीत दरवर्षी 3 लाख 68 हजार कामगारांची गरज भासू शकते असंही अहवाल सांगितलं आहे.
वाढत्या आव्हानांमुळं कामगारांची गरज जास्त
Bertelsmann Stiftung यांच्या अहवालानुसार, जर्मनीला वृद्ध लोकसंख्येचा त्यांच्या श्रमशक्तीवर होणारा प्रभाव कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी या देशाने दरवर्षी शेकडो स्थलांतरितांना येथे आणण्याची गरज आहे, जेणेकरून देशातील कार्यरत संस्था, कार्यालये इत्यादी सुरळीतपणे चालू शकतील. इ Bertelsmann Stiftung अहवालात असे म्हटले आहे की जर्मनीतील स्थलांतर नियमांवरील वाढत्या राजकीय वादाचा येथे पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर मोठा परिणाम होईल. देशातील निर्वासितांची संख्या अलीकडेच वाढल्याने तेथील राजकीय पक्ष कठोर इमिग्रेशन नियमांची वकिली करत आहेत. सन 2000 च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची कमतरता सुरू झाली. 2000 च्या दशकात सुमारे 6 लाख स्थलांतरितांनी जर्मनीत प्रवेश केला असला तरी आता हा आकडा वाढवण्याची गरज आहे. लोकसंख्येतील बदलांमुळे आणि देशातील लोकसंख्येसमोरील वाढत्या आव्हानांमुळे आगामी काळात स्थलांतरितांची गरज भासणार आहे.
अलिकडच्या काळात देशात बेरोजगाराचे प्रमाण वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तरुणांना चांगले शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही. कष्ट करण्याची तयारी असते पण नोकरी, काम धंदा मिळत नाही. पण अशा युवकांसाठी आता परदेशात कामाची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना दरवर्षी या देशात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.