
Star Pravah : लहान मुलांच्या सुरक्षेसाठी स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; आंगणेवाडी जत्रेत सेफ्टी बँडचं वाटप
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीकडून सेफ्टी बँडचं वाटप करण्यात आलं.

आंगणेवाडी : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी (Anganewadi) यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी येतात. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा सहभाग लक्षात घेता यंदा स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आला. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रेत लहान मुलं हरवण्याची शक्यता असते. म्हणूनच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी स्टार प्रवाह वाहिनीकडून सेफ्टी बँड्सचं वाटप करण्यात आलं.
स्टार प्रवाह वाहिनीनं या उपक्रमासाठी दोन कक्षांची उभारणी करण्यात आली होती. या मोहिमे अंतर्गत लहान मुलांच्या हातात स्टार प्रवाहकडून सेफ्टी बँड बांधण्यात आले. या बँडवर पालकांचं आणि पाल्याचं नाव आणि दूरध्वनी क्रमांक यांचा समावेश होता. कणकवली आणि मालवणवरुन येणाऱ्या मार्गावर हे दोन्ही कक्ष भाविकांच्या सेवेसाठी होते. त्यामुळे आता जर ही लाहान मुलं गर्दीमध्ये हरवली तर या सेफ्टी बँडमुळे त्यांना शोधणं सोपं होणार आहे.
भाविकांचं सहकुटुंब सहपरिवार सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनीने हे महत्त्वाचं पाऊल उचललं. या उपक्रमाचा फायदा घेत भाविकांनी आणि लहानग्यांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. स्टार प्रवाहच्या अनोख्या उपक्रमाचं भाविकांकडून कौतुक करण्यात आलं. स्टार प्रवाह मालिकेमधील सुख म्हणजे नक्की काय असतं, आई कुठे काय करते,अबोली, लग्नाची बेडी आणि ठिपक्यांची रांगोळी या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या सर्व कार्यक्रमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Farhan-Shibani Post Marriage : फरहान-शिबानीने लग्नानंतर पापाराझींना दिली मिठाईची भेट
- Farhan-Shibani Wedding : लग्नाआधीच फरहान-शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!
- Farhan Shibani Wedding : मुलाच्या लग्नात जावेद अख्तरांनी केले कविता वाचन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
