Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
त्यांना कळले त्यांच्याशिवाय सरकार बसू शकत नाही आणि त्यांनी पिळायलाला सुरुवात केली, मला कामाची आवड आहे, मी मुख्यमंत्री खुर्चीसाठी हपापलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Raj Thackeray on Uddhav Thackeray : राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 2019 चा निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणालाही न सांगता, विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी माझ्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घाला, असा सुरु केलं, यापूर्वी हा विषय नव्हता, त्यांना कळले त्यांच्याशिवाय सरकार बसू शकत नाही आणि त्यांनी पिळायलाला सुरुवात केली, अशी टीका राज ठाकरे यांनी यानी केली. मला कामाची आवड आहे, मी मुख्यमंत्री खुर्चीसाठी हपापलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हिताच्या गोष्टी असत्या तर समजले असते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत महाराष्ट्र हिताच्या गोष्टी सांगितल्या. उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्री पद नको म्हटलं असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तुमचे डोके फुटले तरी चालतील
राज ठाकरे म्हणाले की, रस्त्याने जाताना ट्राफिक जाम, फुटपाथ नाही याकडे तुमचे लक्ष जाऊ नये म्हणून या सर्व राजकारणी लोकांनी उपाय शोधला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जाती जातीमध्ये द्वेष निर्माण केल्याची टीका राज यांनी पुन्हा एकदा केली. यांना फक्त मत पाहिजे, तुमचे डोके फुटले तरी चालतील. आता दलित ओबीसी वाद सुरू झाल्याचे ते म्हणाले. या भुजबळच्या नदी लागू नका, माळी, मराठा ब्राह्मण हे सर्व मला प्रिय असल्याचे ते म्हणाले. महापुरुष यांची वाटणी जाती जातीत केली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे केवळ ब्राह्मणसाठी बोलले होते का? देशाच्या स्वतंत्र्यासाठी बोलेल होते. महात्मा फुले केवळ माळी समाजासाठी मुलींना शिक्षण देत होते का? घाण राजकारण शरद पवारांनी महाराष्ट्र मध्ये आणले ,तुम्ही याला बळी पडू नका, अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या