एक्स्प्लोर

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

सोलापूर उत्तर मतदारसंघात गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती.

सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी 3 मतदारसंघ हे सोलापूर शहरात येतात. त्यामध्ये, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर मध्य हे मतदारसंघ आहेत. त्यातील सोलापूर शहर उत्तर (Solapur Uttar) विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असून भाजपा महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये लढाई होत आहे. त्यामध्ये, भाजपकडून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महेश कोठे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, विजयकुमार देशमुख यांचं तिकीट जाहीर झाल्यानंतरही भाजप नेत्या शोभा बनशेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभा निवडणुकीतील आपली लढत कायम ठेवली. त्यामुळे, मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

2019 च्या निवडणुकीत काय झालं

सोलापूर उत्तर मतदारसंघात गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती. त्यामध्ये, भाजपचे विजयकुमार देशमुख हे तब्बल 77,324 मतांनी विजयी झाले. त्यांनी, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर सपाटे यांचा त्यांनी पराभव केला होता. विजयकुमार देशमुख यांना 96,529 मतं मिळाली होती. तर, वंचित बहुजन आघाडीच्या आनंद चंदनशिवे यांना 23,461 मतं मिळाली होती. येथे राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे हे तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 19,205 मतं मिळाली होती. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजप महायुतीच्या विजयकुमार देशमुख यांचं पारडं जड मानलं जातं. याशिवाय ते जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील राहिले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत कोणाला लीड

सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपा महायुतीकडून राम सातपुते यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर, काँग्रेस महाविकास आघाडीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व तत्कालीन विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट दिले होते. त्यामुळे, येथील मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत आईच्या पराभवाचा वचपा काढला. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपचे जयसिद्धश्वेर स्वामी हे खासदार बनले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली. लोकसभेच्या 6 पैकी 4 मतदारसंघात प्रणिती शिंदेना 74,197  मताधिक्य मिळालं होतं. त्यापैकी, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांना मताधिक्य आहेत. राम सातपुते यांना तब्बल 35,000 मतांचं मताधिक्य येथे आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातून भाजप महायुतीचं पारडं जड दिसून येते. 

हेही वाचा

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Embed widget