निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
Nagpur News : विदर्भातील वेगवेगळ्या सराफा व्यावसायिकांच्या ऑर्डर नुसार या सोन्या-चांदीची वाहतूक होत असल्याचं सांगितलं जातंय. पण त्यासाठीचा परवाना त्यांच्याकडे नाही.
नागपूर : निवडणुकीच्या धामधुमीत नागपूरमध्ये तब्बल 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली असून हा सर्व मुद्देमाल एकूण 14 कोटी रुपयांचा आहे. हा मुद्दामाल नेणाऱ्या कंपनीच्या गाडीमध्ये त्यासाठीचा परवाना नसल्याचं समोर आलं. त्यामुळे हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी संध्याकाळी नागपूर विद्यापीठ समोरील रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना सिक्वेल लॉजिस्टिक्स या पुरवठा कंपनीची गाडी पोलीस आणि निवडणूक यंत्रणेच्या पथकाने थांबवली. तेव्हा व्हॅनमध्ये 17 किलो सोने दागिने स्वरूपात आणि 55 किलो चांदी ही प्लेट्सच्या स्वरूपात आढळली.
हे सोने आणि चांदी विदर्भातील वेगवेगळ्या सराफा व्यावसायिकांच्या ऑर्डर नुसार त्यांच्या दुकानाच्या पुरवठ्यासाठी नेली जात होती. त्यासाठी सिक्वेल लॉजिस्टिक या दागिने वाहतूक करणाऱ्या कंपनीची सेवा घेण्यात आली होती.
हे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स नागपूरसह अकोला, अमरावती अशा विदर्भातील वेगवेगळ्या शहरातील सराफा व्यवसायिकांनी ऑर्डर स्वरूपात बोलावल्याची माहिती आहे. त्या संदर्भातले कागदपत्रे, बिल सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीकडे होते.
मात्र, आचारसंहितेच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी वाहतुकीच्या माध्यमातून नेण्यासाठी जी परवानगी लागते ती परवानगी त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे तपासणी पथकाने संबंधित सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स जप्त केल्या आहेत. त्या संदर्भात आयकर विभाग तसेच जीएसटी विभागालाही सूचना देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: