Virat Kohli Anushka Sharma : विराट-अनुष्काचा अकाय मोठा झाल्यावर कसा दिसेल? AI ने तयार केला हटके फोटो!
Akaay AI Photo : अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. दरम्यान त्यांच्या दुसऱ्या बाळाचा अर्थात अकायचा (Akaay AI Photo) एआय फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
![Virat Kohli Anushka Sharma : विराट-अनुष्काचा अकाय मोठा झाल्यावर कसा दिसेल? AI ने तयार केला हटके फोटो! Virat Kohli Anushka Sharma Son Akaay AI Photo AI generated photo Viral on Social Media See Pic Marathi News Virat Kohli Anushka Sharma : विराट-अनुष्काचा अकाय मोठा झाल्यावर कसा दिसेल? AI ने तयार केला हटके फोटो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/24/8a3c90348449ae7cc6b0595004d5478e1708787320113254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Virat Kohli Anushka Sharma Son Akaay AI Photo : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी अनुष्काने अकायला (Akaay) जन्म दिला. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत विरुष्काने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अद्याप अकायचा फोटो समोर आलेला नाही. पण विरुष्काचा लाडका मुलगा नक्की कसा दिसतो हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच आता AI ने तयार केलेला अकायचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
AI ने तयार केला हटके फोटो खूपच कमाल आहे. अकाय मोठा झाल्यावर कसा दिसेल हे चाहत्यांना पाहायला मिळत आहे. विरुष्काने अद्याप अकायची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र त्यांचा लाडक्या लेकाचा एआय फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Al-generated imaginary picture of Akaay Kohli. pic.twitter.com/nQg4y9lwBG
— Shubham2.0 (@bhav_paaji) February 22, 2024
अनुष्का-विराटची पोस्ट काय होती? (Anushka Sharma Virat Kohli Post)
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. त्यांनी लिहिलं होतं,"अत्यंत प्रेमाने आम्ही तुमच्यासोबत एक आनंदाची बातमी शेअर करत आहोत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या घरी छोट्या पाहुण्याचं अर्थात वामिकाच्या छोट्या भावाचं आगमन झालं आहे. या आनंदाच्या क्षणी आम्हाला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे".
View this post on Instagram
अनुष्काच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Anushka Sharma Upcoming Movies)
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2021 मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अनुष्का झूलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
'अकाय'चा अर्थ काय? (Akaay Meaning)
विरुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हणटलं जातं. 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' आहे.
विरुष्काची 'प्यारवाली लव्हस्टोरी' (Anushka Sharma Virat Kohli Lovestory)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट 2013 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. विराट ज्यावेळी अनुष्काला पहिल्यांदा भेटला त्यावेळी तो थोडा घाबरलेला होता. पहिल्याच भेटीत विराटच्या एका वाक्यामुळे अनुष्का संतापली होती. पण पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाआधी अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते.
संबंधित बातम्या
Akaay Kohli: बापापेक्षा बेटा सवाई ठरणार! काय सांगते विरुष्काच्या लाडक्या लेकाची कुंडली? अकाय कोहलीच्या जन्मपत्रिकेत आहे खास योग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)