Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?
Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?
New Delhi Railway Station Stampede नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली. प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले. यामुळे हा गोंधळ उडाला.
दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला (Prayagraj trains) जाणारी गाडी (Kumbh Mela special trains) पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सदर घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तर अचानक झालेली गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.




















