Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होण्यापूर्वी, रेल्वेनं दर तासाला 1,500 सामान्य तिकिटं विकली होती, त्यामुळे स्थानकावरील गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. याशिवाय प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढली.

Who Is Responsible For Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावर (Delhi Railway Station) झालेल्या चेंगराचेंगरीत (Delhi Railway Station Stampede) तब्बल 18 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या प्रकरणात, रात्री उशिरापर्यंत रेल्वेकडून अधिकृतपणे या अपघाताला कोण जबाबदार आहे, हे सांगितलेलं नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे अधिकारी किंवा आरपीएफ अधिकाऱ्यांनाही गर्दीचा अंदाज घेता आलेला नाही. दरम्यान, नवी दिल्ली हे संवेदनशील रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. दररोज पाच लाखांहून अधिक लोक या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात.
आरपीएफ अपयशी
संवेदनशील रेल्वे स्टेशन असल्यानं, गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आरपीएफचे विशेष कर्मचारी इथे तैनात असतात. असं असूनही, त्यांच्याकडून गर्दीबद्दल कोणतेही इनपुट देण्यात आलेले नाही. तसेच, गर्दीवर लक्ष ठेवण्यात रेल्वे अधिकाऱ्यांनाही अपयश आल्याचं कालच्या प्रकरणात दिसलं.
CCTV कॅमेऱ्यांनी मॉनिटरिंग
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी 24 तास मॉनिटरिंग केलं जातं. डीआरएम आपल्या ऑफिसमधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर नजर ठेवून असतात. तरिदेखील अधिकाऱ्यांना स्टेशनवरची गर्दी कशी दिसली नाही. अशातच, रेल्वे प्रशासनाकडून सातत्यानं जनरल तिकीटं कशी दिली गेली? यामुळेही नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यताही वाढली. रेल्वेकडून दर तासाला सुमारे 1,500 जनरल तिकिटं विकली जात असल्यानं, स्थानकावरील गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.
#WATCH | Delhi | Visuals from platform number 14 - one of the platforms at New Delhi Railway Station, where a stampede broke out at around 10 PM yesterday, leaving 18 people dead and several others injured. pic.twitter.com/5MeTuDxHRc
— ANI (@ANI) February 16, 2025
रेल्वेकडून दिली गेली अपूर्ण माहिती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रयागराजला जाणाऱ्या दोन ट्रेन्स कॅन्सल करण्यात आल्या. ज्यामुळे प्लॅटफॉर्मवरची गर्दी वाढली. दरम्यान, रेल्वेकडून ट्रेन रद्द करण्यात आल्याच्या चर्चांना फेटाळून लावण्यात आलं आहे. कोणत्याही ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या नव्हत्या, अशी माहिती रेल्वेकडून दिली जात आहे. रेल्वेचं म्हणणं आहे की, चार स्पेशल ट्रेन्स चालवण्यात आल्या आहेत.
गर्दीत जीव गमावल्याची दुःखद घटना : एलजी
दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना म्हणाले की, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या गोंधळ आणि चेंगराचेंगरीमुळे लोकांचा मृत्यू आणि जखमी होण्याची घटना दुर्दैवी आणि दुःखद आहे. एलजीनं ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी मुख्य सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना परिस्थिती सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
पाहा व्हिडीओ : New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

