एक्स्प्लोर

Kiran Mane On Gautami Patil : "पाटलीण आहेस... रुबाबात नाच"; किरण मानेचा गौतमी पाटीलला जाहीर पाठिंबा

Kiran Mane : अभिनेता किरण मानेने सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतमी पाटीलला पाठिंबा दिला आहे.

Kiran Mane On Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमी आणि वाद हे आता समीकरण झालं आहे. सध्या ती तिच्या आडनावामुळे चर्चेत आहे. तिच्यामुळे पाटील आडनावाची बदनामी होत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान अभिनेता किरण मानेने फेसबुक पोस्ट करत गौतमी पाटीलला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे,"पाटलीण आहेस... रुबाबात नाच". 

किरण मानेची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post)

किरण मानेने लिहिलं आहे,"एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे... गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या 'स्वातंत्र्य' या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल".

चिमणीचा संदर्भ देत किरण मानेने लिहिलं आहे, "चिमणीलासुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे... आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये? एखाद्यानं काय बोलायचं... कसं वागायचं...  स्वत:च्या घरात काय खायचं... कोणते कपडे घालायचे... यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच... पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत असेल... धमक्या देत असेल तर हे खूप संतापजनक आणि लाजीरवाणं आहे". 

गावाखेड्यांत गौतमीने लोकप्रियतेचा कळस गाठला आहे : किरण माने

किरण मानेने पुढे लिहिलं आहे,"गौतमी जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्‍यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस. पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्‍या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता 'बिभत्स' असं काहीही नाही. सादरीकरणादरम्यान अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्‍या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे. पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त 'क्रेझ' आहे. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई वेडी होते.. गावाखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस".

मराठी सिनेमा-मालिकांमधील आघाडीच्या अभिनेत्रींपेक्षा तू लोकप्रिय आहेस. बर्‍याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण 'आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस' असं दरडावू पहाणार्‍यांना उंच उंच लांब उडवून लाव. आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली 'पाटलीण' हायेस... रुबाबात नाच, बिनधास्त नाच!" किरण मानेची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

संबंधित बातम्या

Gautami Patil : ज्या कामामुळे तिचं संपूर्ण देशात नाव झालं ते नाव तिने का म्हणून बदलावं? गौतमी पाटीलच्या गावकऱ्यांचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget