Champions Trophy 2025 Ind vs Pak: मोहम्मद रिझवान अल्लाहचे नाव घेतोय, पाकिस्तानच्या कॉमेंटेटरचं विधान, सुरेश रैना म्हणाला, रोहित शर्मा महामृत्युंजय मंत्र...
Champions Trophy 2025 Ind vs Pak: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत समालोचनाची भूमिका करणारा सुरेश रैनाच्या विधानाची चर्चा देखील रंगली आहे.

Champions Trophy 2025 Ind vs Pak: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील (Champions Trophy 2025) हायव्होल्टेज सामन्यात (India vs Pakistan) भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने फक्त 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात, विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने केवळ 4 विकेट्स गमावून पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग केला. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत समालोचनाची भूमिका करणारा सुरेश रैनाच्या (Suresh Rain) विधानाची चर्चा देखील रंगली आहे.
सुरेश रैना नेमकं काय म्हणाला?
पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना सामनाच्या सुरुवातील मोहम्मद रिझवान तस्बीह पठण करताना दिसला. यावर आकाश चोप्रा, जो कॉमेंट्री करत होता, त्याने अचानक विचारले की ते काय करत आहेत. त्यांच्या हातात काय आहे? यावर समालोचन करत असलेल्या पाकिस्तानच्या वहाब रियाझने सांगितले की, ही तस्बीह माळ आहे आणि मोहम्मद रिझवान अल्लाहचे नाव घेत आहेत. यावर सुरेश रैनाने मोठे विधान केले. रैनाने सांगितले की, रोहित शर्मा महामृत्युंजय मंत्र वाचन करत असेल. सुरेश रैनाने विराट कोहलीबाबतही एक विधान केले. विराट कोहली देखील महादेव शंकराचा भक्त आहे आणि त्याने भगवान शिवाचा टॅटू गोंदवून घेतला आहे, असं सुरेश रैना म्हणाला.
View this post on Instagram
भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला-
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं केलं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 241 धावा केल्या. या प्रत्युत्तरात भारताने 42.3 षटकांत धावांचा पाठलाग करत सहज विजय मिळवला. भारताकडून विराट कोहलीचे सर्वाधिक 100 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 56 आणि शुभमन गिलने 46 धावा केल्या.
विराट कोहलीचा विक्रम-
विराट कोहली 2009 मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता. पण या स्पर्धेत विराटने पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करण्यासाठी त्याला 16 वर्षे वाट पहावी लागली. त्याचवेळी, 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर त्याने प्रथमच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे.
Virat Kohli 🤝🏻 The Cover drive 💙
— BCCI (@BCCI) February 24, 2025
Why does the cover drive make the King 👑 feel in his zone?
We've got all bases "𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗲𝗱" 🎙️on this special with Centurion & Milestone Man King Kohli 👌👌 - By @mihirlee_58
WATCH 🎥🔽 #TeamIndia | #ChampionsTrophy | @imVkohli
संबंधित बातमी:
विराट कोहलीची खंबीर फलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
