एक्स्प्लोर

Ind vs Pak Video : तो पाकिस्तानसाठी आला, पण वारं फिरलं की तोही बदलला, कॅमेऱ्यासमोरच घातली टीम इंडियाची जर्सी; भारत-पाकिस्तान मॅचमधील व्हिडीओची तुफान चर्चा!

आयपीएलमध्ये तुम्ही अनेकदा चाहत्यांना सामन्यादरम्यान जर्सी बदलताना पाहिले असेल.

Pakistani Fan Switches To India's Jersey Video : आयपीएलमध्ये तुम्ही अनेकदा चाहत्यांना सामन्यादरम्यान जर्सी बदलताना पाहिले असेल, पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी (23 फेब्रुवारी) झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी चाहता त्याच्या देशाच्या जर्सीपेक्षा टीम इंडियाची जर्सी घालताना दिसत आहे.

सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानी चाहत्याने त्याची जर्सी बदलली. खरं तर,सुरुवातीपासूनच या सामन्यात टीम इंडियाची पकड होती. टीम इंडियाने पाकिस्तानच्या पहिल्या दोन विकेट 50 धावांच्या आत घेतल्या. यानंतर, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतकी भागीदारी करून पाकिस्तान संघाला अडचणीतून बाहेर काढले, परंतु कर्णधार पॅव्हेलियनमध्ये परतताच पाकिस्तान संघ लवकर ऑलआऊट झाला.

एकेकाळी 151 धावांत फक्त 2 विकेट गमावल्यानंतर चांगल्या स्थितीत दिसत असलेला पाकिस्तान पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि त्यांचा 241 धावांतच खेळ खल्लास झाला. पाकिस्तानच्या एकामागून एक विकेट पडत असताना, एका पाकिस्तानी चाहत्याने खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये आपली जर्सी बदलली.

टीम इंडियाने 242 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले. रोहित शर्मा (20) कदाचित लवकर बाद झाला असेल पण त्यानंतर शुभमन गिल (46), श्रेयस अय्यर (56) आणि विराट कोहली यांनी शानदार खेळी करत भारताला आरामात विजय मिळवून दिला. जेव्हा टीम इंडियाला जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता होती, तेव्हा विराटला त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती, अशा परिस्थितीत कोहलीने चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि त्याचे शतकही पूर्ण केले. टीम इंडियाने 45 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होऊन फक्त 5 दिवस झाले आहेत आणि यजमान संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आणि आता त्यांना भारताकडून सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.या विजयासह, टीम इंडिया ग्रुप-अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर चार संघांच्या या टेबलमध्ये पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात ग्रुप-अ चा सामना होणार आहे. जर किवी संघ जिंकला तर भारत आणि न्यूझीलंड संघांना या ग्रुपमधून सेमीफायनलचे तिकीट मिळेल.

हे ही वाचा - 

शतक ठोकलं की विराट 'लॉकेट'ला करतो किस, किंग कोहलीच्या गळ्यातील 'या' खास गोष्टीचं अनुष्का शर्माशी कनेक्शन काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT Vs MI IPL 2026 : शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
GT vs MI Score IPL 2026 : सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
Dasun Shanaka Banned PSL : पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
IPL Black Magic : आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget