Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला उज्जैन महाकालचे थेट VIP दर्शन करायचंय? रांगेत उभे राहण्याचा त्रास नाही, फक्त 'हे' काम त्वरित करा
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला उज्जैन महाकालचे VIP दर्शन घेण्यासाठी घरबसल्या एक काम करू शकता, रांगेत उभे राहण्याचा त्रास नसेल, जाणून घ्या..

Mahashivratri 2025: यंदा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. या निमित्ताने देशभरातील विविध मंदिरांमध्ये भगवान महादेवाच्या भक्तांची वर्दळ पाहायला मिळत आहे. अनेक मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात येत आहे. महाशिवरात्री म्हणजे 'शिवाची रात्र', आणि भगवान शिवाप्रती आपली भक्ती तसेच आदर व्यक्त करण्यासाठी हा एक विशेष प्रसंग मानला जातो. याप्रसंगी अनेक भाविक उज्जैन महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचत आहेत. महाकालाचे VIP दर्शन घेण्यासाठी तुम्ही देखील एक काम करू शकता. हे तुम्हाला लांब रांगेत उभे राहण्यापासून मुक्त करेल. तुम्ही हे बुकिंग कसे करू शकता? जाणून घ्या
महाशिवरात्रीला उज्जैन महाकालचे VIP दर्शन घ्या, फक्त हे काम करा...
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरातील महाकालाचे VIP दर्शन घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. हे तुम्हाला लांब रांगेत उभे राहण्यापासून मुक्त करेल. महाशिवरात्रीनिमित्त भस्म आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आगाऊ ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. भस्म आरतीची आगाऊ तिकिटे बुक करून, तुम्ही मंदिरात पोहोचल्यानंतर रांगेत उभे राहण्यापासून स्वतःला वाचवू शकता. https://shrimahakaleshwar.com/ या अधिकृत साइटला भेट देऊन तिकीट सहजपणे ऑनलाइन बुक केले जाऊ शकतात.
उज्जैन महाकालच्या भस्म आरतीसाठी ऑनलाइन तिकीट कसे बुक कराल?
- ऑनलाइन तिकीट बुक करण्यापूर्वी, तुमचा आयडी प्रूफ सोबत ठेवा,
- यानंतर मंदिराच्या अधिकृत साइट https://shrimahakaleshwar.com/ अधिकृत साइटवर जा.
- येथे तुम्हाला भस्म आरती ॲडव्हान्स बुकिंग रिक्वेस्टचा पर्याय दाखवला जाईल. या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तारीख निवडा.
- यानंतर, तुमच्या तपशीलांसह इतर तपशील भरा (नाव, संपर्क क्रमांक, आधार पुरावा क्रमांक).
- याशिवाय आधार कार्डचा फोटोही अपलोड करावा लागेल.
- फॉर्ममध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त 5 लोकांसाठी तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
- यानंतर फॉर्म सबमिट करा.
- बुकिंग केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर SMS येईल.
उज्जैन महाकालच्या भस्म आरतीची ऑनलाइन किंमत किती आहे?
उज्जैन महाकालच्या भस्म आरतीसाठी 60 दिवस अगोदर ऑनलाइन बुकिंग करू शकता. तुम्हाला हवे असल्यास दर्शनाच्या दोन दिवस आधीही तुम्ही ऑनलाइन बुकिंग करू शकता. ऑनलाइन बुकिंगसाठी भाविकांना 200 रुपये मोजावे लागतात.
हेही वाचा>>>
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी वाचा 'ही' अद्भूत पौराणिक व्रतकथा! भगवान भोलेनाथ स्वत: येतील रक्षणाला, दु:ख, समस्या होतील दूर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
