Ind vs Pak : ना जनाची ना मनाची लाज! हारले तर हारले तर वर विराटसोबत सेल्फी काढत बसले, मायदेशात पाकिस्तानी संघाचे धिंडवडे निघणार?, VIDEO
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-पाकिस्तान सामन्यात रिझवानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो सामना जिंकू शकला नाही.

Pakistan Team Member take selfies With Virat Kohli : भारत-पाकिस्तान सामन्यात किती दबाव असतो हे सर्वांना माहिती आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-पाकिस्तान सामन्यात रिझवानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो सामना जिंकू शकला नाही. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने शानदार खेळी करत पाकिस्तानला 6 विकेट्सने हरवले.
ज्याने पाकिस्तान धू-धू धुतले त्याच व्यक्तीसोबत सेल्फी घेण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना उत्सुकता होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून विराट कोहली होता. आता, पाकिस्तानी खेळाडू सुद्ध कोहलीचे फॅन झाले आहेत, याचा पुरावा म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ.
Pakistan player comes to near Virat Kohli & click the pictures.
— Vinod R Vishwakarma (@we_knowd) February 24, 2025
Virat Kohli Everyone favourite ❣️ pic.twitter.com/UxIegh0V91
टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी विराट कोहलीसोबत एक-एक करून फोटो काढायला सुरुवात केली. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू विराट कोहलीचे किती मोठे फॅन असल्याचे दिसून येते. पण, कोहलीने त्यापैकी कोणालाही निराश केले नाही आणि प्रत्येक पाकिस्तानीसोबत फोटो काढले. पाक खेळाडूंची ही कृती पाहून त्यांचे चाहते नक्की नाराज झाल असतील.
भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सनी केला पराभव
भारत-पाकिस्तान सामन्यात मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 49.4 षटकांत 10 गडी गमावून 241 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, विराट कोहलीने टीम इंडियासाठी शानदार शतक झळकावले आणि टीम इंडियाला 42.3 षटकांत विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पुढचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे, तर पाकिस्तानचा पुढचा सामना 17 मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध आहे.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. तर पाकिस्तानसाठी आता उपांत्य फेरीचे तिकीट स्वप्नापेक्षा कमी राहणार नाही. जर पाकिस्तानला सेमीफायनल सामना खेळायचा असेल तर त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आणि आता त्यांना भारताकडून सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
