Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!
Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना भिवंडी येथील आकृती रुग्णालयातून डिस्चार्ज दहा दिवस उपचार केल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज विनोद कांबळी यांनी नववर्षात नागरिकांनी दारू तसेच इतर व्यसनापासून दूर राहावे असा संदेश दिला प्रकृती स्थिर असून लवकरच मी मैदानावर जाणार हॉस्पिटलमध्ये देखील इंडियाची जर्सी घालून केली फलंदाजी व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त होऊ शकतो याचा अनुभव मला आहे नूतन वर्षात दारू-व्यसनापासून दूर राहा, कुटुंबासोबत प्रेमाने जगा – विनोद कांबळी यांचा संदेश भिवंडीच्या आकृती रुग्णालयातून दहा दिवस उपचारानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृती स्थिर असल्याची माहिती देत कांबळी यांनी नववर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. “व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त होऊ शकते, याचा अनुभव मी घेतला आहे. नवीन वर्षात आपल्या कुटुंबासह प्रेमाने राहा आणि कोणत्याही व्यसनापासून दूर राहा,” असा संदेश त्यांनी दिला. रुग्णालयात असतानाही कांबळी यांनी इंडियाची जर्सी घालून फलंदाजीचा आनंद घेतला. डिस्चार्ज होताना त्यांनी सांगितले की, "या हॉस्पिटलने मला जीवनदान दिले आहे. या रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांचा माझ्यावर अत्यंत प्रेम आहे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन." कांबळी लवकरच मैदानावर परतणार असून शिवाजी पार्कच्या मैदानावर छक्के-चौकार लगावण्याची तयारी करत आहेत. सचिन तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा प्रॅक्टिस करण्याचा उत्साह त्यांनी व्यक्त केला आहे. कांबळी यांच्या या सकारात्मक संदेशाने आणि नशामुक्तीच्या आवाहनाने चाहत्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांनी सांगितले की माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा उपचार आम्ही एक रुग्ण म्हणून नाही तर घरातील सदस्य म्हणून केला आणि त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा सहवास अतिशय आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यांच्यासोबत घालवलेला वेळ कधीच न विसरण्यासारखा आहे.