Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी वाचा 'ही' अद्भूत पौराणिक व्रतकथा! भगवान भोलेनाथ स्वत: येतील रक्षणाला, दु:ख, समस्या होतील दूर
Mahashivratri Vrat Katha in Marathi: असे मानले जाते की, महाशिवरात्रीची ही व्रतकथा वाचल्याने वैवाहिक जीवन सुखी होते आणि जीवन सुख-समृद्धीने भरलेले राहते.

Mahashivratri Vrat Katha in Marathi: महाशिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित एक पवित्र सण आहे, ज्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि रात्रभर जागरण करतात. महाशिवरात्री म्हणजे 'शिवाची रात्र', आणि भगवान शिवाप्रती आपली भक्ती आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा एक विशेष प्रसंग मानला जातो.
महाशिवरात्रीच्या खास मुहूर्ताला करा पूजा!
यंदा 2025 साली महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) सण 26 फेब्रुवारीला साजरा होत आहे. पंचांगानुसार, चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजता समाप्त होईल. या विशेष दिवशी भगवान शंकराची पूजा, रुद्राभिषेक आणि उपवासाचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीला रात्रीच्या चार टप्प्यांमध्ये पूजा आयोजित केली जाते, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यात एक विशेष पूजा पद्धत असते. असे मानले जाते की महाशिवरात्रीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते आणि जीवन सुख-समृद्धीने भरलेले असते. शिवभक्त महाशिवरात्री हा सण आनंदाने, भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीला रात्रपाळीचेही महत्त्व आहे. साधारणपणे प्रत्येक तीज-उत्सवाच्या पूजेमध्ये ब्रह्म मुहूर्तावर किंवा पहाटे पूजा केली जाते, तर महाशिवरात्रीला चारही प्रहार पूजा केल्या जातात.
महाशिवरात्रीची 'ही' व्रतकथा वाचाल तर भोलेनाथाची होईल कृपा!
महाशिवरात्रीच्या आख्यायिकेनुसार, एक पारधी जंगलात शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला, पारधी त्यांच्या दिशेने बाण सोडणार, तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला, 'हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येऊ दे' हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली.
दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज हाताला चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता, त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले की, 'आता मला मार, मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे, तेंव्हा लगेच मादी हरिण पुढे आली आणि तिने म्हंटले 'त्यांना नको, मला मार, मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे'
त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ''आईला नको, आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे'' ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाशिर्वाद दिला. आणि सर्वांचा उध्दार केला, हरिणाला मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले.
हेही वाचा>>>
GajKesari Rajyog 2025: होळीपूर्वी बनतोय मोठा राजयोग! 'या' 5 राशीचे लोक बनतील मालामाल, बंपर फायदा, नोकरीत प्रमोशन, उत्पन्नाचे नवे स्रोत मिळणार
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















