शतक ठोकलं की विराट 'लॉकेट'ला करतो किस, किंग कोहलीच्या गळ्यातील 'या' खास गोष्टीचं अनुष्का शर्माशी कनेक्शन काय?
Virat Kohli And Anushka Sharma Locket Story : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी कपल आहे. विराटच्या गळ्यातील लॉकेटचा अनुष्काशी फार जवळचा संबंध आहे.

Virat Kohli And Anushka Sharma : देशातील कोट्यवधी लोकांनी 23 फेब्रुवारी रोजीचा भारत-पाकिस्तान सामना पाहिला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने केलेल्या कामगारीची सर्वत्र चर्चा झाली. त्याने दमदार शतक ठोकल्यामुळे आता त्याच्या लव्ह स्टोरीचीही चांगलीच चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या गळ्यातील लॉकेटचं आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिचा नेमका काय संबंध आहे? हे जाणून घेऊ या...
लॉकेट आणि अनुष्का शर्माचा आहे संबंध
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे एक सेलिब्रेटी कपल आहे. त्यांची सोशल मिडिया तसेच इतर माध्यमांवर नेहमीच चर्चा असते. विराट कोहली मैदानावर जेव्हा-जेव्हा चांगली कामगिरी करतो, तेव्हा-तेव्हा तो त्याच्या गळ्यातील लॉकेटचे प्रेमाने चुंबन घेतो. या लॉकेटचा अनुष्का शर्माशी फार जवळचा संबंध आहे. हे लॉकेट आणि विराट कोहलीचे सेलीब्रेशन याला सात वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती.
इटलीत केलं होतं लग्न
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे 2013 साली एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्ताने एकमेकांच्या जवळ आले. कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली आणि याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे 2017 सालातील डिसेंबर महिन्यात त्यांनी इटलीत लग्न केले. आजघडीला हे दोघेही एकमेकांप्रतीचे प्रेम सोशल मीडियावर खुलेपणाने व्यक्त करताना दिसतात.
View this post on Instagram
विराटच्या गळ्यातील लॉकेटमध्ये नेमकं काय आहे?
विराट कोहली हा अनुष्का शर्मावर जीवापाड प्रेम करतो. विशेष म्हणजे त्याच्या क्रिकेटमधील यशामागे अनुष्काचा फार मोठा वाटा आहे, असे विराटने अनेकदा म्हटलेले आहे. काही वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात विराटने 51 वे शतक झळकावले होते. याच आनंदामध्ये त्याने गळ्यातून लॉकेट बाहेर काढून त्याचे चुंबन घेतले होते. याआधीही विराटने अशाच प्रकारे आपला आनंद साजरा केला होता. विराट कोहलीच्या गळ्यात असलेल्या या लॉकेटमध्ये त्याची वेडिंग रिंग आहे. याच लॉकेटचे चुंबन घेत विराट कोहली त्याच्या यशाचे श्रेय अनुष्का शर्माला देतो.
2018 साली झाली होती सुरुवात
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या या लॉकेटच्या स्टोरीला 2018 साली पहिल्यांदा सुरुवात झाली होती. या साली भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्यांदा त्याच्या गळ्यातील लॉकेट बाहेर काढून दाखवले होते. त्यानंतर 2018 साली भारताचा इंग्लंडविरोधात सामना होता. या सामन्यात विराटने 22 वे कसोटी शतक झळकावले होते. या शतकाच्या आनंदात विराटने गळ्यातील लॉकेट बाहेर काढून त्याचे चुंबन घेतले होते. मध्यंतरीच्या काळात विराट कोहलीचा फॉर्म बिघडला होता. तो चांगल्या धावा करण्यात अपयशी ठरत होता. याचा दोष अनुष्का शर्माला दिला जात होता. त्यामुळे सगळ्यांचे तोंड गप्प करण्यासाठी विराट कोहलीने गल्यातील लॉकेटला किस केलं होतं. तेव्हापासून विराट आणि अनुष्काची ही लॉकेट स्टोरी सगळीकडे प्रसिद्ध आहे.
हेही वाचा :

























