एक्स्प्लोर

Poonam Mahajan : 'गोपी मामामुळे ऐट होती, पंकजांसोबतचं रिलेशन'...पूनम महाजन 'माझा कट्टा'वर भरभरुन बोलल्या

Poonam Mahajan on Pankaja Munde, Majha Katta : भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी मुंडे आणि ठाकेर कुटुंबियासोबत असलेल्या संबंधांवर भाष्य केलं आहे.

Poonam Mahajan on Pankaja Munde, Majha Katta : भाजप नेत्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी ठाकरे कुटुंबिय आणि मुंडे कुटुंबियांसोबत असलेल्या संबंधाबाबत भाष्य केलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर आज (दि.8) पूनम महाजन बोलताना पूनम महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेल्या रिलेशनबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. 

पूनम महाजन काय काय म्हणाल्या? 

मी गोपीनाथ मुंडेंना गोपीमामा म्हणायचे. गोपीमामा असल्यामुळे माझी तशी ऐट राहिली होती. 2014 ला निवडून आले, जेव्हा शपथ घेतली. समोर गोपीनाथ मुंडे असतील आपलं संसदेत ठीक राहिलं, असं वाटायचं. डोळे शोधत होते, ते पण नाही राहिले. दोघींचे वडिल नाहीयेत. त्यानुसार आमचा प्रवास खडतर असेल. पण मी भरपूर वाचन करते मला वाचायची आवड आहे. आपल्या आयुष्यात काही पान  पुस्तकांसाठी बनत असतात. मला वाटतं तिच्या आणि माझ्या आयुष्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आमची चर्चा राजकारणापेक्षा मुलं -बाळ, सासू -नणंद यावर चर्चा होती. निवडणुका लढतो, तेव्हा आम्ही एकमेकींसाठी प्रार्थना करत होतो. कधी आम्ही एकमेकांना ताई-माई म्हटलो नाही. राजकारण सोडून आम्ही आयुष्य सोबत घालवलं. सुख सर्वांबरोबर वाटतो. दु:ख आम्ही एकमेकिंबरोबर वाटतो, असं पूनम महाजन म्हणाल्या. 

मी प्रमोदजींच्या भाषणांचं संकलन करणार आहे

पूनम महाजन म्हणाल्या, माझी सध्याची वेळ दुर्दैवाची नाहीये. मी सकारात्मक माणूस आहे. पुढील पाच वर्षे कदाचित माझ्या सुदैवाची असतील. प्रमोद महाजन यांच्या भाषणाचं संकलन माझ्याकडे आहे. पण ते एवढ्या चांगल्या क्वालिटीचं नाहीये. त्यासाठी मी माझी जुनी युवा मोर्चाची जी टीम आहे, त्यातील मुलांचे मी सांगते त्याकडे लक्ष असते. आता मी निवडणूक झाल्यानंतर एक टीम बनवणार आहे. प्रमोदजींचं काम संपूर्ण देशभरात आहे. खूप काळ लोटलाय, पण एवढाही काळ लोटलेला नाही. त्यामुळे प्रमोदजींच्या भाषणांचं संकलन मी करणार आहे. एक पुस्तक किंवा डॉक्युमेंट्री बनवण्याचा प्रयत्न करेन. फक्त त्यासाठी माझी संपत्ती कमी आहे, मला भरपूर लोकांकडे मदत घेण्यासाठी जावे लागेल. 

महायुतीच्या सरकारने नव्या संकल्पना आणि योजना आणल्या

पुढे बोलताना पूनम महाजन म्हणाल्या, आम्ही निवडणुका असल्या की जास्त व्यस्त असतो. मतदारसंघात तसेच संबंध आहेत.नवीन मतदार कसे जोडू शकतो, यावर मी लक्ष देत आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात प्रवास सुरु केला होता. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील कॉलेजमधील तरुणांशी संवाद होत होता. नवीन मतदार जोडण्याचा प्रयत्न सुरु केला होता. महायुतीच्या सरकारने नव्या संकल्पना आणि योजना आणल्या. त्याचा काय इम्पॅक्ट काय होतो? याचा अभ्यास करणे महत्त्वाचे होते. आमचा चांगला प्रवास झाला. येणाऱ्या दोन चार दिवसांत आम्ही प्रचाराची सुरुवात करु. 

लोकसभेचं तिकीट मिळणार नाही, याचा अंदाज नव्हता. तसा अंदाज आला असता तर मी कामाला सुरुवात केली नसती. मला अंदाज आला असता तर मी त्या हिशोबाने काम केलं असतं. बोलणं सुरु असतं, पण पाठिमागे बोललं तर आपण कामाचा धडाका वाढवत असतो. मी माझ्या वडिलांना पाहात आले, त्यांच्या बाजूला राजकीय कुजबूज व्हायची, त्याचा त्यांनी मनावर झाला नाही. तसाच मी देखील प्रयत्न करत होते. 2009 ला मी घाटकोपर पश्चिममध्ये पडले होते. 2014 ला सुद्धा काँग्रेसचा गड होता, त्यामुळे कोण लढायला तयार नव्हते. मात्र, आम्हाला वाटलं आम्ही ही सीट काढू शकतो. हवा सुरु होती. त्यामुळे वाटलं ही जागा काढू शकतो. त्यानंतर दोन वेळेस मी त्या मतदारसंघातून विजयी झाले, असंही पूनम महाजन म्हणाल्या. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Poonam Mahajan : दिल्लीवाले म्हणतात, महाराष्ट्रातील नेत्यांनी तिकीट कापलं, तिकीट राखण्यासाठी मी वकिली शिकायला हवी होती; पूनम महाजनांचा रोख कुणावर?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget