
मोठी बातमी : पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी पुण्यात, बिल्डरपुत्राने ठोकलेल्या गाडीची तपासणी, नेमकं काय सापडलं?
Pune Accident News : पुणे अपघात प्रकरणात क्षणाक्षणाला नवीन अपडेट समोर येत आहेत. आता पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले असून त्यांनी गाडीची तपासणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यामध्ये (Pune Accident News) पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर आता पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. एकीकडे यंत्रणांकडून अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न होत असताना या प्रकरणात नवनवीन पुरावे समोर येत आहेत. आता या प्रकरणी बिल्डरपुत्राने ठोकलेल्या पोर्शे गाडीची तपासणीसाठी पोर्शे कंपनीची टीम पुण्यात दाखल झाली आहे. पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींनी गाडीची तपासणी केल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर येणार आहे.
पोर्शे कार कंपनीचे पथक पुण्यात दाखल
पोर्शे कार कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी मुंबईतून पुण्यात बिल्डरच्या कारची तपासणी करण्यासाठी पोहोचले. गाडीमध्ये काही तांत्रिक दोष होता असा आरोप करण्यात येत होता. मात्र, खरंच असं काही होतं का याचा तपास पोर्शे कंपनीच्या पथकाकडून करण्यात येत आहे. पुण्यातील येरवडा पोलिस स्थानकात उभ्या असलेल्या पोर्शे कारची तपासणी करण्यासाठी पोर्शे कंपनीचं पथक पोहोचलं आहे.
बिल्डरच्या कारची पोर्शे टीमकडून तपासणी
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल यांच्या वकिलांकडून गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं आरोप करण्यात येत होता. मात्र, आता पोलिसांनी थेट पोर्शे कार कंपनीच्या अधिकृत पथकाला बोलावण्यात आलं आहे. त्यांच्याकडून गाडीची तपासणी करण्यात येत आहे. गाडीत तांत्रिक बिघाड असल्याचं सांगत अग्रवालांच्या वकिलांकडून पळण्याचा मार्ग तयार करण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी यामध्ये थेट पोर्शे कंपनीची मदत घेतली आहे. पोर्शे कार कंपनीच्या मुंबई सेंटरहून प्रतिनिधी विविध तांत्रित बाबींची तपासणी करण्यात येत आहे.
नेमकं काय सापडलं?
कार तपासणीसाठी आलेल्या पोर्शे कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी मिकी घई यांच्यासोबत बोलताना सांगितलं की, आम्ही सध्या गाडीची पूर्णपणे तपासणी करत आहोत. ही गाडी ऑटोमॅटीक आहे. तपासणीनंतर आम्ही याबाबत अधिक माहिती देऊ शकू, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, तपासणीनंतर गाडीत तांत्रिक बिघाड होता की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
ससून रुग्णालयाचा शिपाईदेखील अटकेत
डॉक्टर आणि विशाल अग्रवाल यांच्यात पैशांची देवाण-घेवाण करणारा ससूनच्या शिपाईवर देखील कारवाई करत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयाचा शिपाई अमित घटकांबळे याला अटक केली आहे. ससून हॉस्पिटलच्या शिपाईच वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपये घेऊन आला होता. अमित हा ससून रुग्णालयात शवविच्छेदन विभागात शिपाई म्हणून काम करतो. त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
