एक्स्प्लोर

Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक

माझ्या भाच्याने म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या नोकरानेच आमची जागा हडप केली आहे. धनंजयला हे करायची गरज नाही, पण त्याच्या नोकराने बालाजी मुंडेने मला पनवेलनं बोलवलं आणि दीड एकरची जागा हडप केली.

मुंबई : राज्यात एकीकडे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असून पंकजा मुंडे याही गप्प असल्याने त्यांनाही लक्ष्य केलं जात आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे, सध्या बीड आणि बीडमधील नेते केंद्रस्थानी आहेत. त्यातच, प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी देखील मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंवर (Pankaja munde) गंभीर आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांनी यापूर्वी देखील मुंडे धनंजय मुंडेंवर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. आता, आपल्या जमीनप्रकरणी सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला खात्री दिली आहे, मी तुमचं काम करुन देईल, असे सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हटले. तसेच, धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंवरही गंभीर आरोप केले आहेत.  

माझ्या भाच्याने म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या नोकरानेच आमची जागा हडप केली आहे. धनंजयला हे करायची गरज नाही, पण त्याच्या नोकराने बालाजी मुंडेने मला पनवेलनं बोलवलं आणि दीड एकरची जागा हडप केली. मला माझी जागा माहिती नव्हती, ते असं करतील हे मला माहिती नव्हतं. पण, मला गोड बोलून परळीत बोलवलं आणि ओलीस ठेवलं. त्यानंतर, रजिस्टार ऑफिसला नेलं आणि सह्या करुन फोटो काढत बाहेर काढून दिलं. त्यावेळी, दहशतीत आम्ही सह्या केल्या, आपले नातेवाईक असे नाहीत असंच आपल्याला वाटत असतं. मात्र, आता दहशत काय हे मला कळतंय, असा घटनाक्रम सांगत धनंजय मुंडेंनीच माझी जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.   

मी केस देखील टाकली आहे, अंबेजोगाईला देखील तक्रार दिली आहे. मात्र, येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, सगळीकडून ताशेरे ओढले गेले, तेव्हा मला पोलिसांनी कागदपत्र दिले. विशेष म्हणजे रिसिव्ह कॉपी ठाण्याच्या घरी मिळाल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटले. मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की, न्याय मिळवून देतो. अजित पवार यांनी देखील खात्री दिली आहे, धनंजयला समोर आणत न्याय मिळून देतो सांगितल्याचंही सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीनंतर म्हटलं.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचे मी समर्थन करेल, दीड वर्षे मला प्रचंड त्रास दिला आहे. स्वत: भेटायचा नाही, स्वत:चीच जागा होती, असं दाखवत होता. चोराकडेच न्याय मागते आहे, असं वाटायला लागले. त्यामुळे, धनंजयची आमदारकी देखील रद्द करावी, त्याने जनतेत राहून काम करावं, माज कमी करावा, अशा शब्दात सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेच्या राजीनामा मागणीचे समर्थन केलं आहे. तसेच, पंकजा धुतल्या तांदळाची नाही, तिची देखील मुकसंमंती होती, असे म्हणत सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. माझ्याकडे मुंडे यांचे नातेवाईक म्हणून न पाहाता सर्वसामान्य नागरिक म्हणून पाहावं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील यांच्याविरोधात लढायला बळ मिळेल, असे महाजन यांनी म्हटलं आहे.  

बीड जिल्ह्यात अधिकारी बदलावे

बीड जिल्ह्यात दुसऱ्या भागातील अधिकारी सरकारने ठेवावे, जेणे करुन अधिकारी त्याचं ऐकणार नाहीत. धनंजय मुंडे यांच्या घरी जिल्हाधिकारी जातो, रजिस्टार एसपी येतात असं मला त्यांचेच लोकं सांगतात. येथील जमीन त्यांच्याशिवाय विकल्या जात नाहीत, असेही त्यांनी सांगितले.  

साडे तीन कोटींची जमीन 21 लाखांत घेतली

साडेतीन कोटींची जमीन ही धमकी देऊन फक्त 21 लाखांना घेतली. परळीत बोलवून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. सही केल्याशिवाय परळीतून बाहेर जाऊ देणार नाही अशी धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धमकीही दिल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. यामध्ये सारंगी महाजन यांनी वाल्मिक कराडचेही नाव घेतलं आहे.  या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.

हेही वाचा

भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget