Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
Special Report Ajit Pawar :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क केल्याची आणि सत्तेत सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वगळून पक्षातील इतर सात खासदारांच्या (NCP MP) भेटी घेऊन त्यांना यासंबंधीची ऑफर दिल्याची माहिती होती. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मी कोणालाही संपर्क साधलेला नाही, असं स्पष्टीकरण दिलेलं होतं. त्यानंतर आता खासदार अमर काळेंनी नाव फोडलं आहे.
खासदार अमर काळेंनी कोणाचं नाव सांगितलं?
खासदार अमर काळे यांनी एबीपी माझाला माहिती देताना सांगितलं की, काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या, आणि त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत चला असा आग्रह केला होता. जर विकास कामे करायची असतील तर तुम्हाला एनडीएमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही असं ही त्या म्हणाल्या होत्या. केवळ अमर काळेच नाही तर निलेश लंके, भगरे गुरुजी, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बप्पा या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला होता. सुनील तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही. सोनिया दुहान संपर्क करत होत्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.