Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोप
Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोप
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आमदार सुरेश धस यांच्यावर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. आता, या आरोपावर सुरेश धस यांनी पलटवार करत राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत नवाच प्रश्न उपस्थित केलाय. अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्या-सारक्या लेकरांना कशाला बोलायला लावतो. बडी मुन्नीनं पुढं यावं, बडी मुन्नीलाही माहितीय. त्या मुन्नीनं पुढं यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो अशा शब्दात सुरेश धस (Suresh dhas) यांनी आता नवाच बॉम्ब टाकला आहे. तसेच, अमोल मिटकरींचा बोलवता धनी हा बडी मुन्नी असल्याचेही त्यांनी सूचवले. त्यामुळे, महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. धस यांच्यावर खंडणी, हत्या व जमिनी बळकावल्याचे गुन्हे असल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला होता. त्यानंतर, आमदार धस यांनी त्यांच्यास्टाईलने टीका केलीय.