Special Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?
Special Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी सगळे पक्ष सरसावले आहेत.. भेटीगाठींना जोर चढला आहे..उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा सूर पुन्हा एकदा आळवला आहे.. तशी इच्छा मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा बोलून दाखवल्याची माहिती आहे... महाविकास आघाडी सोबत निवडणूक का लढवायची नाही याची कारणे सुद्धा उद्धव ठाकरे यांना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितली.. त्यावर काँग्रेसने नागपूर महापालिकेत स्वबळावर लढू असं उत्तर दिलं आहे.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट... विधानसभेत झालेल्या दारुण पराभवाचं शल्य बाजूला सारून ठाकरेंची शिवसेना आता मिशन महापालिकेसाठी सरसावलीय... पण प्रश्न आहे तो म्हणजे महाविकास आघाडीसोबत लढायचं की एकला चलो रेच्या मार्गानं जायचं... लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंना मविआत असण्याचा फायदा झाला होता... तर विधानसभेत तोटा... त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा स्वबळाचे सूर आळवायला सुरूवात केलीय... तशी इच्छा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा बोलून दाखवल्याची माहिती आहे...या बैठकीत काँग्रेसवरचीही नाराजी उफाळून आली...