Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Palghar News: शिवसेना शिंदे गटाचे डहाणू तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी (Ashok Dhodi) हे मागील 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत. दरम्यान या प्रकरणाचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

पालघर: बारा दिवसापासून अपहरण झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा संघटक अशोक धोडी (Ashok Dhodi) यांच्या तपासासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अशोक धोडी यांची गाडी आणि मृतदेह गुजरातच्या भिलाडमधील सरिगाम माला फलीया येथील एका बंद पडलेल्या खदानीमध्ये मिळून आली आहे. दरम्यान गेल्या बारा दिवसापासून तपास घेत असलेल्या पालघर (Palghar) पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेला अखेर यश आले आहे. तर ज्या पद्धतीने माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केलीय, त्यांनाही तशाच प्रकारची शिक्षा व्हावी, अशी मागणी अशोक धोडी यांच्या मुलाने केली आहे. सोबतच आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती मृत अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी याने व्यक्त केले आहे.
दरम्यान, गेले बारा दिवस पोलीस यंत्रणा या तपासाच्या मागे होती. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर तपास सुरू असताना चार आरोपी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. या प्रकरणी अजूनही तीन आरोपी फरार असून त्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा सर्व उलगडा होईल. अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन केली हत्या
पुढे आलेल्या माहितीनुसार, बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे . गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची गाडी आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं यानंतर उघड झालंय .
अखेर पालघर पोलिसांना बारा दिवसानंतर यश
गेल्या 20 जानेवारीपासून बेपत्या असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना बारा दिवसानंतर यश आल . मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं . मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठला असून गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकळली . आज बारा दिवसानंतर पालघर पोलिसांना अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आल आहे . तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
