तीन महिने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; स्थानिकांनी आरोपीला पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime News: मुंबईतील धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन महिने मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

Mumbai Crime News: राज्यात (Maharashtra News) महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. मुंबईच्या (Mumbai News) वांद्रे (Bandra) पूर्वेकडील संजीवनी नगर (Sanjivani Nagar) भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणार्या 40 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्थानिक नागरिकांनी या नराधमाला पकडून निर्मल नगर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलीस स्थानकात (Police Station) दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. मुनाव्वर मलिक (40 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या (Nirmal Nagar Police Station) हद्दीत संजीवनी नगरमध्ये राहणाऱ्या एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी मुनावर मलिक हा मागील तीन महिन्यापासून वारंवार चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत होता. याची चाहूल परिसरातील नागरिकांना लागताच नागरिकांनी घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधम मुनावर याला पकडलं आणि पकडून सोमवारी निर्मल नगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. यानंतर पोलिसांनी आरोपी मुनावर विरोधात बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार, पोक्सो (POCSO Act) कायद्यांतर्गत अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी निर्मल नगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत होते. मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील संजीवनी नगर भागांत ते वास्तव्याला होते. 40 वर्षीय मुनावर मलिक हा 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आल्याची माहिती त्याच परिसरातील स्थानिक नागरिकांना मिळाली. नागरिकांनी मुनावरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली आणि 9 वर्षीय मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. मुनावर गेल्या तीन महिन्यांपासून चिमुकलीचं लैंगिक शोषण करत होता. निर्मल नगर पोलिसांनी याप्रकरणी मुनावर विरोधाक पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Thane News : ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांसह पाच जणांना अटक वॉरंट जारी, कोर्टाकडून समन्स जारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
